top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

प्रश्न-पत्र - २


    प्रश्न-पत्रिका – २


  • खालील प्रश्न प्रत्येकी १ गुणांना आहेत.  

  • खालील प्रश्नांची उत्तरं, प्रश्न-पत्रिकेच्या शेवटी दिलेली आहेत. 

  • सगळ्या रिकाम्या जागांचे प्रश्न हे, ‘एका वाक्यात उत्तरे लिहा, जोड्या लावा, चूक की बरोबर ते लिहा, योग्य पर्याय निवडा’ यांसाठी देखील उपयुक्त आहेत. 

  • सगळे प्रश्नपत्र हे tabbhibola या वेबसाइट च्या आधारावर तयार केले गेले आहेत. 




 १] रिकाम्या जागा भरा.                    (प्रत्येकी १ गुण)


१) कालो मार्ग: .......... ......... ........  ..........  लय ।

यति ......... ........ ......... ......... दशस्मृता ।।

२) कोणत्याही तालाचा जो खंडानुसार वेळ निश्चित होतो, त्यास .........

असे म्हणतात. 

३) प्राचीन काळी भरतमूनी व शारंग देवांनी ......... मार्ग सांगितलेले आहेत. 

४) हातानी ताल मोजताना बोटाच्या व तळव्याच्या ज्या विशिष्ट हालचाली होतात,

त्यास .......... असे म्हणतात. 

५) क्रियेचे दोन प्रकार आहेत, ........ क्रिया व ......... क्रिया. 

६) तालाच्या विविध भागांना वा अवयवांना ............ असे म्हणतात. 

७) संगीत वा ताल सुरू होण्याच्या क्रियेस .............. असे म्हणतात. 

८) ग्रहांचे ............ प्रकार आहेत. 

९) जातींचे .............. प्रकार आहेत. 

१०) लयीचे मुख्य ............ प्रकार आहेत. 

११) लयीला सुंदर रूप देण्यासाठी जे नियम अथवा सिद्धांत आहेत त्यांना ..........

असे म्हणतात. 

१२) यतीचे एकूण .......... प्रकार आहेत. 

१३) उत्तर हिंदुस्तानी व दक्षिण हिंदुस्तानी संगीत पद्धतीत .......... स्वर तर ..........

श्रुती आहेत. 

१४) उत्तर हिंदुस्तानी व दक्षिण हिंदुस्तानी संगीत पद्धतीत राग निर्मिती ............

होते. 

१५) उत्तर हिंदुस्तानी व दक्षिण हिंदुस्तानी संगीत पद्धती .............. आधारित

आहेत. 

१६) वर्णम्, कृती, पदम्, पल्लवी, जावळी, कीर्तनम् हे गायन प्रकार ............

............ संगीत पद्धतीमध्ये गायले जातात. 

१७) उत्तर हिंदुस्तानी संगीत पद्धतीमध्ये ............ सप्तके मानली जातात. 

१८) राग वर्गीकरण ............ थाटांवर आधारलेले आहे. 

१९) मुख्य ............ ताल-लिपि पद्धती आहेत. 

२०) पंडित .......... व पंडित .......... ताल-लिपि पद्धती प्रचलित आहेत. 

२१) तबला हे एक ............ आहे. 

२२) तबला हे एक ............ आहे. 

२३) ध्रुपद गायकीचा आविष्कार .......... .............. ............... यांनी केला. 

२४) ध्रुपद-धमार गायकीच्या साथीसाठी ................ हे तालवाद्य वापरले जाते. 

२५) ख्याल गायकीच्या साथीसाठी ................ हे तालवाद्य वापरले जाते.




उत्तरं –

१) क्रियांगानी, ग्रहो, जाती, कला  व प्रस्तार कश्चेती ताल प्राण

२) काल ३) चार ४) क्रिया ५) सशब्द व नि:शब्द

६) अंग ७) ग्रह ८) चार ९) पाच १०) तीन

११) यती १२) पाच १३) बारा, बावीस १४) थाटांमधून १५) रागांवर १६) उत्तर हिंदुस्तानी १७) तीन १८) दहा १९) दोन २०) भातखंडे व पलुस्कर २१) तालवाद्य २२) अवनद्ध २३) राजा मानसिंह तोमर २४) पखवाज २५) तबला


Recent Posts

See All

प्रश्नपत्र - ५

प्रश्न-पत्रिका – ५  खालील प्रश्न प्रत्येकी १ गुणांना आहेत.  खालील प्रश्नांची उत्तरं प्रश्न-पत्रिकेच्या शेवटी दिलेली आहेत.  सगळ्या...

प्रश्न-पत्र - ४

प्रश्न-पत्रिका – ४  खालील प्रश्न प्रत्येकी १ गुणांना आहेत.  खालील प्रश्नांची उत्तरं प्रश्न-पत्रिकेच्या शेवटी दिलेली आहेत.  सगळ्या...

प्रश्न-पत्र -३

प्रश्न-पत्रिका – ३  खालील प्रश्न प्रत्येकी १ गुणांना आहेत.  खालील प्रश्नांची उत्तरं प्रश्न-पत्रिकेच्या शेवटी दिलेली आहेत.  सगळ्या...

Comments


bottom of page