top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

प्रश्न-पत्र - ४


प्रश्न-पत्रिका – ४ 

 

 खालील प्रश्न प्रत्येकी १ गुणांना आहेत.

 खालील प्रश्नांची उत्तरं प्रश्न-पत्रिकेच्या शेवटी दिलेली आहेत.

 सगळ्या रिकाम्या जागांचे प्रश्न हे, ‘एका वाक्यात उत्तरे लिहा, जोड्या लावा,

   चूक की बरोबर ते लिहा, योग्य पर्याय निवडा’ यांसाठी देखील उपयुक्त

   आहेत.

 सगळे प्रश्नपत्र हे tabbhibola या वेबसाइट च्या आधारावर तयार केले गेले

   आहेत.

 

 

 

१] रिकाम्या जागा भरा.                    (प्रत्येकी १ गुण)


१) लखनौ बाजाला ........... बाज असेही म्हणतात.


२) लखनौ बाजावर ............ शैलीचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर झालेला आढळून येतो.


३) लखनौ चे नवाब हे ............. शौकीन होते.


४) .............. हे घराणे लखनौ घराण्याचे शागीर्द घराणे मानले जाते.


५) फरुखाबाद घराण्याचा .............. हा अतिशय लोकप्रिय आहे.


६) .......... ........... ............. हे बनारस घराण्याचे संस्थापक होय.


७) बनारस घराण्यात वाजविला जाणारा .............. हा प्रकार अतिशय सौंदर्यपूर्ण आहे.


८) उस्ताद मियाँ कादर बक्ष खाँ साहेब यांनी ............. घराण्याची मुहूर्तमेढ रोवली.


९) पंजाब घराण्यात तबल्यावर .............. मारून वाजविण्याची पद्धत आहे.


१०) उस्ताद मुनीर खाँ साहेबांचा जन्म ............ साली ............. जिल्ह्यातील ............. या खेड्यात झाला.


११) उस्ताद मुनीर खाँ साहेबांच्या वडिलांचे नाव .......... ............ ........... होते.


१२) उस्ताद मुनीर खाँ साहेब यांनी एकूण ........... उस्तादांचे शिष्यत्व पत्करून आपला तबला समृद्ध केला होता.


१३) उस्ताद मुनीर खाँ साहेब १८ नोव्हेंबर १९६७ रोजी ........... येथे पैगंबरवासी झाले.


१४) उस्ताद मुनीर खाँ साहेबांच्या सांगण्यावरून खलिफा पदाचा वारसा .......... ............. ............. खाँ साहेबांकडे आला.


१५) उस्ताद अमीर हुसेन खाँ साहेबांचा जन्म ............ साली ............. जिल्ह्यातील ............. या खेड्यात झाला.


१६) उस्ताद अमीर हुसेन साहेबांच्या वडिलांचे नाव .......... ............... ............ ........ साहेब होते व ते एक नामवंत सारंगी वादक होते.


१७) उस्ताद अमीर हुसेन खाँ साहेबांना मुस्लिम कलावंतांच्या ................. जमातीच्या ............... पदाचा मान मिळाला होता.


१८) उस्ताद अमीर हुसेन खाँ साहेबांचे निधन दिनांक ........................... रोजी यकृताच्या कर्करोगाने मुंबई येथे झाले.


१९) उस्ताद हबीब उद्दीन खाँ साहेबांचा जन्म ............ साली ............ जिल्ह्यात झाला.


२०) उस्ताद हबीब उद्दीन खाँ साहेबांचे वडिल ................. ........... ........... ............ साहेब होते. ते अजराडा घराण्याचे एक अद्वितीय तबला नवाझ होते.


२१) उस्ताद हबीब उद्दीन खाँ साहेबांचे निधन दिनांक ........................... रोजी झाले.


२२) उस्ताद अहमदजान थिरकवाँ खाँ साहेबांचा जन्म उत्तर प्रदेशातील ................. येथे इ.स. .............. साली झाला.


२३) उस्ताद अहमदजान थिरकवाँ खाँ साहेबांना भारत सरकारने ................. पुरस्कार व .................. पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.


२४) उस्ताद अहमदजान थिरकवाँ खाँ साहेबांचे निधन दिनांक ........................ रोजी ............... येथे झाले.


२५) फरुखाबाद घराण्याचे कायदे मोठे असतात ज्यांना ................. असे म्हंटले जाते.



उत्तरे -


१} थापियाँ २} नृत्य ३} नृत्याचे ४} फरुखाबाद ५} पेशकार

६} पंडित रामसहाय ७} बाँट ८} पंजाब ९} थाप १०} १८६३, मेरठ, ललियाना ११} उस्ताद काले खाँ १२} चौवीस १३} रायगढ़ १४} उस्ताद अमीर हुसैन १५} १८९९, मेरठ, बनखंडा

१६} उस्ताद अहमद बक्ष खाँ १७} कुरेशी, चौधरी १८} ५ जानेवारी १९६९ १९} १८९९, मेरठ २०} मरहूम उस्ताद शम्मू खाँ २१} २० जुलै १९७२ २२} मुरादाबाद, १८८१ २३} राष्ट्रपती, पद्मभूषण २४} १३ जानेवारी १९७६, लखनौ २५} लंबछड




Recent Posts

See All

प्रश्नपत्र - ५

प्रश्न-पत्रिका – ५  खालील प्रश्न प्रत्येकी १ गुणांना आहेत.  खालील प्रश्नांची उत्तरं प्रश्न-पत्रिकेच्या शेवटी दिलेली आहेत.  सगळ्या...

प्रश्न-पत्र -३

प्रश्न-पत्रिका – ३  खालील प्रश्न प्रत्येकी १ गुणांना आहेत.  खालील प्रश्नांची उत्तरं प्रश्न-पत्रिकेच्या शेवटी दिलेली आहेत.  सगळ्या...

प्रश्न-पत्र - २

प्रश्न-पत्रिका – २ खालील प्रश्न प्रत्येकी १ गुणांना आहेत. खालील प्रश्नांची उत्तरं, प्रश्न-पत्रिकेच्या शेवटी दिलेली आहेत. सगळ्या रिकाम्या...

Commentaires


bottom of page