top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

प्रश्न-पत्र -३


प्रश्न-पत्रिका – ३ 

 

 खालील प्रश्न प्रत्येकी १ गुणांना आहेत.

 खालील प्रश्नांची उत्तरं प्रश्न-पत्रिकेच्या शेवटी दिलेली आहेत.

 सगळ्या रिकाम्या जागांचे प्रश्न हे, ‘एका वाक्यात उत्तरे लिहा, जोड्या लावा,

   चूक की बरोबर ते लिहा, योग्य पर्याय निवडा’ यांसाठी देखील उपयुक्त

   आहेत.

 सगळे प्रश्नपत्र हे tabbhibola या वेबसाइट च्या आधारावर तयार केले गेले

   आहेत.

 

 

 

१] रिकाम्या जागा भरा.                       (प्रत्येकी १ गुण)

 

 

१) तबल्याच्या जनकामध्ये .........  .......... ........ यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.

 

२) तबल्याला आधुनिक रूप देण्याचे व त्याला विकसित करण्याचे श्रेय ........ ......... ....... ........   यांना दिले जाते.

 

३) भारतीय संगीत ....... ........ व ........ या तत्वांवर आधारित आहे.

 

४) गीते तालयुक्त ........ ......... । जैच्छे कर्णधार बिना ........ ......... हैं ।।

 

५)  डग्ग्यातून ........ तर तबल्यातून ........ ध्वनी/स्वर निर्माण होतो.

 

६) तबला, पखवाज, मृदंगम, ढोलकी, ढोलक या वाद्यांना  ........ ........ असे म्हणतात.

 

७) सतार, वीणा, सारंगी, सरोद, व्हायोलिन, दिलरुबा या वाद्यांना  ............ असे म्हणतात.

 

८)  सतार, वीणा, गिटार या वाद्यांना ........ ....... असे म्हणतात.

 

९)  सारंगी, व्हायोलिन, दिलरुबा या वाद्यांना ....... ....... असे म्हणतात.

 

१०) बासरी,सनई/शेहनाई, हार्मोनिअम ही ........ ....... आहेत.

 

११) टाळ, घंटा, त्रिभुज ही .......... ........ आहेत.

 

१२) भारतीय वाद्यांचे वर्गीकरण ......... प्रकारात केले गेले आहे.

 

१३) विविध स्वरांचे तबले एकत्रित आणून ......... ......... बनविले जाते.

 

१४) गट्ठे ठोकण्यासाठी  .................. वापर केला जातो.

 

१५) तबल्यामध्ये प्रस्थापित झालेल्या विविध शैलींना ............ असे संबोधले जाते.

 

१६) ......... बाज व ........ बाज हे दोन मुख्य बाजाचे प्रकार आहेत.

 

१७) बाज म्हणजे ............ .

 

१८) .......... ......... हे आद्य घराणे मानले जाते.

 

१९) दिल्ली घराणे हे ........... ..........  बाज म्हणून ओळखले जाते.

 

२०) तबल्यातील एकूण घराणी .......... आहेत.

 

२१) दिल्ली घराण्याचे प्रवर्तक ......... ........... ....... ........ हे आहेत.

 

२२) ........ हे घराणे हे दिल्ली घराण्याचे शागीर्द घराणे म्हणून ओळखले जाते.

 

२३) लखनौ घराण्यावर ........... या वाद्याचा अत्यंत प्रभाव दिसून येतो.

 

२४) दिल्ली, अजराडा ही ......... बाजाची घराणी आहेत.

 

२५) लखनौ, फरुखाबाद, पंजाब व बनारस ही ......... बाजाची घराणी आहेत.  

 

 

 

 

उत्तरं -

          १) उस्ताद अमीर खुसरौ २) उस्ताद सिद्धार खाँ ढाढी    ३) स्वर, ताल, लय ४) तालबिना शुद्धीचय व नौका तैच्छ ५) खर्ज, तार

          ६) अवनद्ध वाद्य/तालवाद्य/चर्मवाद्य    ७) तंतू वाद्य    ८) तत् वाद्य    ९) वितत् वाद्य    १०) सुषिर वाद्य

       ११) घन वाद्य    १२) चार    १३) तबला तरंग    १४) हातोडी    १५) घराणी 

       १६) बंद व खुला    १७) बजाना/वाजविणे    १८) दिल्ली घराणे    १९) दोन बोटांचा    २०) सहा

        २१) उस्ताद सिद्धार खाँ ढाढी    २२) अजराडा    २३) पखवाज    २४) बंद    २५) खुल्या

Recent Posts

See All

प्रश्नपत्र - ५

प्रश्न-पत्रिका – ५  खालील प्रश्न प्रत्येकी १ गुणांना आहेत.  खालील प्रश्नांची उत्तरं प्रश्न-पत्रिकेच्या शेवटी दिलेली आहेत.  सगळ्या...

प्रश्न-पत्र - ४

प्रश्न-पत्रिका – ४  खालील प्रश्न प्रत्येकी १ गुणांना आहेत.  खालील प्रश्नांची उत्तरं प्रश्न-पत्रिकेच्या शेवटी दिलेली आहेत.  सगळ्या...

प्रश्न-पत्र - २

प्रश्न-पत्रिका – २ खालील प्रश्न प्रत्येकी १ गुणांना आहेत. खालील प्रश्नांची उत्तरं, प्रश्न-पत्रिकेच्या शेवटी दिलेली आहेत. सगळ्या रिकाम्या...

Comments


bottom of page