top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

उत्तर हिंदुस्थानी संगीताची वैशिष्ट्ये, तत्त्व


१) रंजकता हा प्रधान गुणधर्म.


२) मूळ सप्तक शुद्ध स्वरांचे, म्हणजे बिलावल थाटाचे.


३) बावीस श्रुती, शुद्ध व विकृत मिळून बारा स्वर, यावरच संपूर्ण संगीताची उभारणी.


४) तीन सप्तके मानली गेली आहेत.

i} मंद्र सप्तक ii} मध्य सप्तक iii} तार सप्तक


५) दहा थाट हे रागवर्गीकरणाचे आधार आहेत.


६) रागांमधील स्वरसंख्येवरुन रागांच्या प्रमुख जाती तीन व उपजाती सहा, अशा एकूण नऊ जाती मानल्या गेल्या आहेत. रागात कमीतकमी पाच स्वर लागतात.


७) रागांमध्ये 'सा' हा स्वर कधीच वर्ज्य नसतो. तसेच रागांमध्ये एकाच वेळी 'म' व 'प' हे दोन्ही स्वर वर्ज्य करता येत नाहीत. दोन्ही पैकी एक स्वर आवश्यक असतो.


८) रागामध्ये एकाच स्वराचे शुद्ध-विकृत स्वरुप एकापुढे एक असे सहसा घेता येत नाहीत / घेतले जात नाहीत.


९) रागाला पूर्वांग-उत्तरांग असतो. 'सा ते म' हा पूर्वांग तर 'प ते सा' हा उत्तरांग. पूर्वांगात वादी स्वर असल्यास राग पूर्वांग प्रधान होतो, उत्तरांगात वादी स्वर असल्यास राग उत्तरांग प्रधान होतो. पूर्वांग प्रधान राग दिवसाचे पूर्वार्धात गातात तर उत्तरांग प्रधान राग दिवसाचे उत्तरार्धात गातात.


१०) स्वरांच्या स्वरुपावरुन रागाचे तीन वर्ग संगीतात केले आहेत.

i} रे - ध = शुद्ध राग.

ii} रे - ध = कोमल राग.

iii} ग - नि = कोमल राग.

या वर्गीकरणाचा रागसमयाशी फार निकटचा संबंध आहे.


११) रागामध्ये वादी व संवादी स्वर एक-एकच असतो. वादी पूर्वांगात असेल तर संवादी उत्तरांगात असतो व संवादी पूर्वांगात असेल तर वादी उत्तरांगात असतो. वादी-संवादी हे नेहमी षड्ज-मध्यम, षड्ज-पंचम भावातच येतात / असतात.


१२) रागामध्ये मध्यम या स्वरास फार महत्व आहे. रात्री व मध्य रात्रीचे रागात तीव्र मध्यमाचे प्रमाण जास्त असते. नंतर हळू हळू शुद्ध मध्यम प्रभावी होत जातो.


१३) हिंदुस्थानी संगीत स्वर-संगीतावर आधारलेले आहे.


१४) रागाला वादी-संवादी, थाट, जाती, रंजकता, गानसमय, मुख्यांग, स्वर-संगती, आरोह-अवरोह, वर्ज्यावर्ज्य नियम इ. गोष्टींची आवश्यकता असते.


१५) हिंदुस्थानी संगीतातील ताल आणि त्यांचे ठेके हे त्या संगीताचे खास वैशिष्ट्य आहे. मात्रांची संख्या सारखी असली तरी बोल भिन्न असल्यामुळे तालांचे वजन आणि स्वरूप बदलते.


ही सगळी उत्तर हिंदुस्थानी संगीताची वैशिष्ट्ये आहेत..

Recent Posts

See All

Comments


bottom of page