top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

उत्तर हिंदुस्थानी संगीत पद्धती


महाराष्ट्रापासून काश्मिर पर्यंत सर्व ठिकाणी उत्तर हिंदुस्थानी संगीत पद्धती प्रचलित आहे. या संगीत पद्धतीमध्ये ब्रज व उर्दू ह्या भाषांचा वापर केला जातो. मुस्लिम राजे विलासी असल्याने जेव्हा उत्तर हिंदुस्थानी संगीत, दरबारात गेले तेंव्हा शृंगारिक विषयांवर काव्य रचना होऊ लागल्या. या संगीत पद्धतीमधील सर्वच ताल, प्रामुख्याने पखवाज आणि तबला या वाद्यांवर वाजविले जातात. पखवाज आणि तबला या वाद्यांवर एकल वादनही केले जाते. या संगीत पद्धतीमध्ये प्रामुख्याने २० ते २५ ताल प्रचारात आहेत. प्रत्येक तालाचे ठेके वेगवेगळे असतात. सगळ्या तालांचे बोल वेगवेगळे असतात. ताल रचनेमध्ये कोणताही बदल होत नाही, तर त्या तालाच्या मात्रांमध्येच बोलांचा, रचनांचा विस्तार केला जातो. ग्वाल्हेर-नरेश राजा मानसिंह तोमर यांच्या कालखंडात ध्रुपद-धमार गायनशैली अस्तित्वात होती, ज्याचे काम क्लिष्ट अशा गणिती पद्धतीवर अवलंबून होते. त्यामुळेच जास्त मात्रांच्या तालांमध्ये गायन-वादन करण्याचा रिवाज होता. पखवाज वादकांनाही तशीच साथ करावी लागत होती. परंतू, ख्याल सारखी मृदू, मुलायम गायन शैली सादर करताना तालाकडेही जास्त लक्ष द्यावे लागायचे, त्यामुळे कमी मात्रांच्या तालांचा प्रचार आणि प्रसार या संगीत पद्धतीमध्ये जास्त झाला.


उत्तर हिंदुस्थानी ताल पद्धतीच्या रचनेचा सिद्धांत


अ ) विभागीकरण - हिंदुस्थानी संगीतातील ताल निर्माण करताना सुरवातीला मात्रा निश्चित केल्या जातात. त्यांनतर त्यांचे विभाग (वर्गीकरण) केले जातात. हे विभाग दोन मात्रांपासून ते पाच मात्रांपर्यंत असतात.


ब ) कालाची निश्चिती - ज्याप्रमाणे प्रत्येक तालात सम असते त्याप्रमाणे कालही असतो. सर्वसाधारणपणे तालाची सम पहिल्या मात्रेवर असते तर कालाचे स्थान हे तालाच्या मध्यभागी असते.


क ) बोलांची निश्चिती - उत्तर हिंदुस्थानी संगीत पद्धतीमध्ये अनेक गीतप्रकार प्रचलित आहेत. त्यांच्या शांत, गंभीर, सौंदर्यपूर्ण बोलांनुसार तालाच्या बोलांची निवड केली जाते आणि ताल रचना केली जाते.


उत्तर हिंदुस्थानी संगीत पद्धतीतील तालांची संक्षिप्त सूची


दादरा, तिनताल, झपताल, केहेरवा, रुपक, एकताल, खेमटा, सुलताल, चौताल, तेवरा, धुमाळी, दीपचंदी, झुमरा, तिलवाडा, अध्धा तिनताल, पंजाबी, धमार, पश्तो, चाचर, आडाचौताल, मत्तताल इ.

Recent Posts

See All

Comments


bottom of page