top of page

उस्ताद खलिफा नथ्थू खॉं साहेब

  • Writer: Team TabBhiBola
    Team TabBhiBola
  • Oct 18, 2020
  • 1 min read

Updated: Jan 29, 2021


अ} जन्म आणि बालपण :- इ.स. १८७५ साली दिल्ली येथे उस्ताद खलिफा नथ्थू खॉं साहेबांचा जन्म झाला. दिल्ली घराण्याचे सुप्रसिद्ध तबला नवाझ बोलीबक्श खॉं साहेबांचे हे चिरंजीव व उस्ताद काले खॉं साहेबांचे नातू. त्यांचे सर्व शिक्षण बोलीबक्श खॉं साहेबांकडे झाले. दिवसाचे १६ ते १८ तास रियाझ करीत असल्याने दिल्लीच्या कित्येक मुश्किल कायद्यांवर त्यांनी प्रभुत्व मिळविले होते.


ब} वादन वैशिष्ट्ये :- दिल्लीचा सुप्रिसद्ध कायदा 'धाs तीट धाs तीट धा धा तीट धागे तिनाकीन' - त्यांचा अतिशय आवडीचा असून त्याचे विविध प्रकारे बल ते करीत असत. कुठलाही कायदा त्याच्या ठराविक वेगातच वाजला पाहिजे. कमी अधिक वेगात वाजल्यास त्यातील सौंदर्य स्थळे नष्ट होतात, ह्या विचारांचे ते होते. त्यामुळे त्यांनी आपल्या ध्वनिमुद्रिकेत वाजवतानासुद्धा कायद्यांची दुप्पट, सय्यमाने केलेली असून बोलांचे स्पष्ट निकाल आणि दायाँ-बायाँ चे वजन या गोष्टींना महत्व दिल्याचे दिसून येते. विशिष्ट कायदा ते कल्पनातीत वेगात वाजवित असत. दायाँ-बायाँ वरील बोलांच्या निकासाच्या वजनाला महत्व देत असल्यामुळे त्यांचे तबला वादन अतिशय आकर्षक होत असे. उस्ताद अमीर हुसेन खॉं साहेब त्यांच्या वादनाची वाखणणी करीत असत. त्यांच्या तबलावादनाच्या दोन ध्वनिमुद्रिका निघाल्या परंतु आता त्या दुर्मिळ झाल्या आहेत.


क} मृत्यू :- इ.स. १९४० मध्ये वयाच्या ६५व्या वर्षी ह्या महान तबलावादकाचे देहावसान झाले.

Recent Posts

See All
उस्ताद करामतुल्ला खॉं साहेब

अ} जन्म आणि बालपण :- उस्ताद करामतुल्ला खॉं साहेब यांचा जन्म इ.स. १९१८ साली उत्तर प्रदेशातील रामपूर येथे झाला. फरुखाबाद घराण्याचे...

 
 
 
उस्ताद गामे खॉं

१} बालपण आणि शिक्षण :- दिल्ली घराण्याचे सुप्रसिद्ध तबला नवाझ मरहूम उस्ताद छोटे काले खॉं साहेबांचे हे सुपुत्र. वयाच्या पाचव्या वर्षांपासून...

 
 
 
उस्ताद इनाम अली खॉं साहेब

१} जन्म :- उस्ताद ईनाम अली खॉं साहेबांचा जन्म १२ नोव्हेंबर १९२८ रोजी झाला. दिल्ली घराण्याचे मशहूर तबला नवाझ उस्ताद गामे खॉं साहेबांचे हे...

 
 
 

Comments


bottom of page