top of page

उस्ताद हबीबउद्दीन खॉं साहेब

  • Writer: Team TabBhiBola
    Team TabBhiBola
  • Oct 18, 2020
  • 1 min read

Updated: Jan 29, 2021


अ} जन्म आणि बालपण :- उस्ताद हबीबउद्दीन खॉं साहेबांचा जन्म १८९९

साली मेरठ येथे झाला. त्यांचे वडील मरहूम शम्मू खॉं साहेब अजराडा घराण्याचे एक अद्वितीय तबला नवाझ होते. वयाच्या बाराव्या वर्षांपासून त्यांनी आपल्या वडलांकडे तबल्याची तालीम घेण्यास सुरवात केली.


ब} प्रगत शिक्षण :- पंधरा वर्षांच्या कठोर तपश्चर्येनंतर खॉं साहेबांनी दिल्ली घराण्याचे सुप्रसिद्ध तबला नवाझ उस्ताद नथ्थू खॉं साहेबांचा गंडा बांधला. काही वर्ष त्यांच्याकडे शिकल्यानंतर अनेक घराण्यांचे माहेर असलेल्या उस्ताद मुनीर खॉं साहेबांची शागिर्दी त्यांनी पत्करली. त्यांच्या ज्ञानार्जनच्या आवडीमुळे त्यांच्याकडे अनेक घराण्यांचा बाज एकत्र येऊन त्यांचा तबला शुद्ध बनला.


क} वादन वैशिष्ट्ये :- अत्यंत मिठास तबलावादनाबद्दल त्यांची ख्याती आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या बोटांची तयारीसुद्धा विलक्षण होती. लयींशी, लयबंधांशी लपंडाव खेळत तबला वाजवण्याची त्यांची नखरेल पद्धत श्रोत्यांना क्षणार्धात आकर्षून घेत असे. भारतातील अनेक संगीत सभांमध्ये त्यांनी यशस्वी तबला वादन केले. त्यांच्या तबला वादनाच्या रेकॉर्डस् दिल्ली व मुंबई नभोवाणी केंद्रावरून अधून-मधून आजही वाजत असतात आणि त्यावरूनच आपल्याला त्यांच्या वादनाची कल्पना येते. ते साथ-संगतही उत्तम प्रकारे करीत असल्यामुळे निरनिराळ्या प्रख्यात तंतकारांकडून व गायकांकडून त्यांना खूप मागणी होती.


ड} शिष्य :- त्यांच्या शिष्यांमध्ये सुपुत्र मंजी खॉं तसेच दिल्लीचे हशमत अली खॉं,

रमझान खॉं, पं. श्रीधर व पं. सुधीर सक्सेना यांची नावे उल्लेखनीय आहेत.


इ} मृत्यू :- पक्षाघाताचे वारे मेंदूपर्यंत गेल्यामुळे त्यांची स्मृती जवळजवळ

नष्ट झालेली होती. दुर्दैवाने २० जुलै १९७२ रोजी ह्याच विकाराने त्यांचा मृत्यू झाला.

Recent Posts

See All
उस्ताद करामतुल्ला खॉं साहेब

अ} जन्म आणि बालपण :- उस्ताद करामतुल्ला खॉं साहेब यांचा जन्म इ.स. १९१८ साली उत्तर प्रदेशातील रामपूर येथे झाला. फरुखाबाद घराण्याचे...

 
 
 
उस्ताद गामे खॉं

१} बालपण आणि शिक्षण :- दिल्ली घराण्याचे सुप्रसिद्ध तबला नवाझ मरहूम उस्ताद छोटे काले खॉं साहेबांचे हे सुपुत्र. वयाच्या पाचव्या वर्षांपासून...

 
 
 
उस्ताद इनाम अली खॉं साहेब

१} जन्म :- उस्ताद ईनाम अली खॉं साहेबांचा जन्म १२ नोव्हेंबर १९२८ रोजी झाला. दिल्ली घराण्याचे मशहूर तबला नवाझ उस्ताद गामे खॉं साहेबांचे हे...

 
 
 

Comments


bottom of page