top of page

उस्ताद गामे खॉं

  • Writer: Team TabBhiBola
    Team TabBhiBola
  • Oct 18, 2020
  • 1 min read

Updated: Jan 28, 2021


१} बालपण आणि शिक्षण :- दिल्ली घराण्याचे सुप्रसिद्ध तबला नवाझ मरहूम उस्ताद छोटे काले खॉं साहेबांचे हे सुपुत्र. वयाच्या पाचव्या वर्षांपासून त्यांनी आपल्या वडलांजवळ तबल्याची तालीम घेण्यास सुरवात केली. उस्ताद गामे खॉं साहेब पंधरा वर्षांचे असताना त्यांचे वडील म्हणजे उस्ताद काले खॉं साहेब पैगंबरवासी झाले. त्यांनतर वडलांकडून मिळालेल्या ज्ञानाचा आणि मार्गदर्शनाचा उपयोग करून त्यांनी अविश्रांत मेहनत घेतली.


२} वादन वैशिष्ट्ये :- दिवसाचे अनेक तास तबल्याचा रियाज ते करीत असत. सतत तबल्याच्या विश्वात आणि विचारांमध्ये ते बुडालेले असत. भारतातील अनेक संगीत सभा त्यांनी आपल्या वादनाने गाजवल्या. पुढे दिल्ली घराण्याचा खलिफा पदाचा मान त्यांच्याकडे आला. अनेक मोठे तबलिये, उस्ताद व इतर कलावंत त्यांचा आदर करीत असत.


३} शिष्य परिवार :- त्यांनी वादनाबरोबरच आपल्या उदार स्वभावामुळे अनेक शिष्य घडविले. त्यांच्या शिष्य वर्गात त्यांचे चिरंजीव उस्ताद इनाम अली खॉं, पंजाबचे उस्ताद फकीर महंमद खॉं, लाहोरचे उस्ताद धौना व तुफेल, इंदोरचे नारायणराव इंदोरकर, मुंबईचे उस्ताद महंमद अहमद खॉं, रिजराम देसद व

पं. मारुतीराव कीर ह्यांची नावे उल्लेखनीय आहेत.


४} मृत्यू :- इ.स. १९५८ मध्ये उस्ताद गामे खॉं साहेब पैगंबरवासी झाले.

Recent Posts

See All
उस्ताद करामतुल्ला खॉं साहेब

अ} जन्म आणि बालपण :- उस्ताद करामतुल्ला खॉं साहेब यांचा जन्म इ.स. १९१८ साली उत्तर प्रदेशातील रामपूर येथे झाला. फरुखाबाद घराण्याचे...

 
 
 
उस्ताद इनाम अली खॉं साहेब

१} जन्म :- उस्ताद ईनाम अली खॉं साहेबांचा जन्म १२ नोव्हेंबर १९२८ रोजी झाला. दिल्ली घराण्याचे मशहूर तबला नवाझ उस्ताद गामे खॉं साहेबांचे हे...

 
 
 
उस्ताद आफाक हुसैन

अ} जन्म, बालपण, प्रारंभिक शिक्षण :- उस्ताद आफाक हुसैन साहेबांचा जन्म नोव्हेंबर १९३० साली झाला. वयाच्या चौथ्या वर्षांपासून आपले आजोबा...

 
 
 

Comments


bottom of page