top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

तालांचे उपयोग


१} तिनताल :- बडा ख्याल, छोटा ख्याल, शास्रीय संगीत, उपशास्रीय संगीत, साथ-संगत, स्वतंत्र तबला वादन, चित्रपट संगीत, नाट्यसंगीत, नृत्यसंगत, तंतू वाद्य यांच्या साथीला तिनताल ताल वाजविला जातो.


२} तिलवाडा :- विलंबित ख्याल, शास्रीय संगीत तसेच ग्वाल्हेर घराण्यातील ख्याल गायनाच्या साथीला तिलवाडा ताल वाजविला जातो.


३} झपताल :- छोटा ख्याल, शास्रीय संगीत, उपशास्रीय संगीत, स्वतंत्र तबला वादन, साथ-सांगत, चित्रपट संगीत, तंतू वाद्य यांच्या साथीला झपताल ताल वाजविला जातो.


४} सुलताल :- ध्रुपद-धमार आणि नृत्याच्या साथीला सुलताल ताल वाजविला जातो.


५} रूपक :- छोटा ख्याल, उपशास्रीय संगीत, स्वतंत्र तबला वादन, साथ-सांगत, चित्रपट संगीत, तंतू वाद्याच्या साथीला रूपक ताल वाजविला जातो.


६} तेवरा :- ध्रुपद गायन, नृत्यसंगत, उपशास्रीय संगीत, सुगम संगीत यांच्या साथीला तेवरा ताल वाजविला जातो.


७} एकताल :- बडा ख्याल, छोटा ख्याल, शास्रीय संगीत, उपशास्रीय संगीत, स्वतंत्र तबला वादन, नृत्य-संगत, चित्रपट संगीत, सुगम संगीत, नाट्य संगीत, तंतू वाद्य यांच्या साथीला एकताल वाजविला जातो.


८} चौताल :- धृपद गायनाच्या आणि नृत्याच्या साथीला चौताल ताल वाजविला जातो.


९} आडा चौताल :- ख्याल गायन, शास्रीय संगीत, उपशास्रीय संगीत, नृत्य-संगत यांच्या साथीला आडा-चौताल ताल वाजविला जातो.


१०} धमार :- धमार गायन आणि नृत्य-संगत यांच्या साथीला धमार ताल वाजविला जातो.


११} दीपचंदी :- ठुमरी गायन प्रकार, नाट्य संगीत, सुगम संगीत, भजन यांच्या साथीला दीपचंदी ताल वाजविला जातो.


१२} झुमरा :- बडा ख्याल गायनाच्या साथीला झुमरा ताल वाजविला जातो.


१३} केहरवा :- ठुमरी, गझल, टप्पा गायन, उपशास्रीय संगीत, सुगम संगीत, चित्रपट संगीत, नाट्य संगीत, सुफी संगीत यांच्या साथीला केहरवा ताल वाजविला जातो.


१४} धुमाळी :- उपशास्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन, कीर्तन यांच्या साथीला धुमाळी ताल वाजविला जातो.


१५} दादरा :- उपशास्रीय संगीत, ठुमरी, गझल,टप्पा, सुगम संगीत, चित्रपट संगीत, दादरा गायन प्रकार, नाट्य संगीत यांच्या साथीला दादरा ताल वाजविला जातो.


१६} पशतो :- टप्पा गायनाच्या साथीला टप्पा ताल वाजविला जातो.


१७} अध्धा तीनताल :- नाट्य संगीत, उपशास्रीय संगीत, सुगम संगीत, चित्रपट संगीत, भजन, तंतू वाद्य संगत, नृत्य-संगत यांच्या साथीला अध्धा तीनताल वाजविला जातो.


१८} पंजाबी :- भजन, उपशास्रीय संगीत, सुगम संगीत, चित्रपट संगीत, नृत्य-संगत यांच्या साथीला पंजाबी ताल वाजविला जातो.


YouTube Link - https://youtu.be/N49LJyeX2-c?si=jeWNEX7KDbuDq6Wb

Recent Posts

See All

तालांची वैशिष्टये -

१) तीनताल / त्रिताल - हा तबल्यातील व स्वतंत्र तबला वादनातील प्रमुख ताल आहे. विलंबित, मध्य व द्रुत अशा तीनही लयीत हा ताल वाजविला जातो....

Comments


bottom of page