तबल्याची प्रमुख घराणी आणि त्यांची वादनशैली
- Team TabBhiBola
- Dec 13, 2020
- 1 min read
Updated: Jan 29, 2021
दिल्ली घराणे आणि त्याचा बाज हा इतर प्रचलित घराण्यांचा जनक आहे. दिल्ली घराण्यातील काही शागीर्द निरनिराळ्या प्रांतात स्थायिक झाले. तेथील स्थानिक परिस्थिती व प्रचलीत संगीताच्या आवश्यकतेनुसार त्यांनी आपल्या घराणेदार, परंपरागत वादनशैलीत बदल केले. आपल्या प्रतिभा व प्रयोगशीलतेनुसार नवीन शैली निर्माण केली. त्यांनतर त्या शैलीचे अनुकरण पुत्र व शिष्य या क्रमाने पिढ्यानपिढ्या कायम राहिले तेव्हा त्या परंपरेस घराणे म्हणून मान्यता प्राप्त झाली. अशाप्रकारे उत्तर हिंदुस्थानी संगीतात मान्यता प्राप्त अशी एकूण सहा घराणी आहेत.
१) दिल्ली घराणे.
२) अजराडा घराणे.
३) लखनौ घराणे.
४) फरुखाबाद घराणे.
५) बनारस घराणे.
६) पंजाब घराणे.
Recent Posts
See All६) पंजाब घराणे - भारतातील सहा प्रमुख घराण्यांपैकी 'पंजाब' घराणे हे तबलावादनातील वैशिष्टयपूर्ण घराणे ठरले ते त्याच्या तबला वादनातील...
५) बनारस घराणे :- या घराण्याचे संस्थापक पंडित रामसहाय हे होत. हे लखनौ घराण्याचे खलिफा उस्ताद मोदू खॉं यांचे शिष्य. पं.रामसहाय यांनी...
४) फरुखाबाद घराणे :- खुल्या बाजातील लखनौ या आद्य घराण्याचे हे शागीर्द घराणे होय. लखनौ घराण्याचे उस्ताद बक्षू खॉं यांचे जावई उस्ताद हाजी...
Comments