top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

तबल्याची भाषा - शब्दालंकार


तबल्याची भाषा -


कोणत्याही भाषेचा मुख्य हेतू, मनातील भाव व्यक्त करणे हा असतो. अर्थात भाषा हे भाव-अभिव्यक्तीचे माध्यम आहे आणि भाषा निर्मितीचं प्रमुख साधन म्हणजे कंठातून उत्पन्न होणारे विविध नाद. माणसाच्या मेंदूप्रमाणेच त्याचे स्वरयंत्र देखील असामान्य क्षमतेचे असते. त्यातून अगणित नाद निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळेच मानवी भाषा अधिक समृद्ध बनू शकते. समृद्ध भाषा-निर्मितीचं नेमक हेच कारण तबला या वाद्यालाही लागू होते. या वाद्याच्या विभिन्न नाद-निर्मितीच्या शक्यतेमुळे, या वाद्यातून अनेक शब्दबंधांची निर्मिती होणे शक्य झाले आणि त्यातूनच या वाद्याची स्वतंत्र भाषा बनत गेली.


मानवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजा पूर्ण झाल्यावर मानवाला स्व-अभिव्यक्तीची गरज भासू लागते. आपली वेगळी ओळख निर्माण करण्याच्या इर्षेतूनच विविध कला जन्माला आल्या असाव्यात. माणसाच्या ह्या कलासक्ततेतूनच मानवी भाषा अलंकारिक होत असते. सर्वसाधारणपणे आपण सहज किंवा अकृत्रिम भाषेत बोलत असतो परंतु भाषेतील प्रभाव वाढविण्यासाठी कधी कधी आपण जाणीवपूर्वक काही विशिष्ट शब्दप्रयोग करतो. या शब्दप्रयोगांनाच 'भाषालंकार' असे म्हणतात. भाषालंकाराचे शब्दालंकार व अर्थालंकार असे दोन प्रकार आहेत. त्यापैकी अर्थालंकार हे चमत्कृतीतून निर्माण होतात तर शब्दालंकार हे नाद-चमत्कृतीतून तयार होतात. तबल्याच्या भाषेला कोणताही मानवी अर्थ प्राप्त होत नसल्याने या भाषेमध्ये अर्थालंकार निर्माण होत नाहीत. मात्र या वाद्यातून निर्माण होणारे विविध बंद-खुले तसेच खर्ज-तार हे नाद आणि या नादांच्या सहाय्याने निर्माण होणारे छंद यामुळे या वाद्यातील रचनांमध्ये अनुप्रास, यमक आणि यति यांसारखे शब्दालंकार दिसून येतात.

Recent Posts

See All

'बायाँ' च्या वादनात संतुलन राखण्यासाठी रियाजाची पद्धत

तबला हे वाद्य दायाँ (तबला) आणि बायाँ (डग्गा) या दोन वाद्यांचा मेळ साधून निर्माण झालेले वाद्य आहे. तबल्यातून (दायाँ) निघालेले 'तार-स्वर'...

पढंतची आवश्यकता -

स्वतंत्र तबलावादनाच्या सादरीकरणामध्ये 'पढंत'चे स्थान महत्वपूर्ण आहे. या सादरीकरणामध्ये प्रथम वाचेद्वारे वाचून नंतर त्याचं सादरीकरण (पेश...

Комментарии


bottom of page