top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

तबला स्वरात मिळविण्याचे नियम / तंत्र


तबला हे केवळ ताल वाद्य नसून ते एक सांगीतिक वाद्य आहे. सर्व संगीत

प्रकारांच्या (शास्रीय, उपशास्रीय, सुगम इ.) साथीसाठी तबला या वाद्याचा उपयोग केला जातो. या वाद्याचा सुरेलपणा हेच या मागचे महत्वाचे कारण आहे. त्यामुळे तबल्याच्या विद्यार्थ्यांना तबला सुरात लावण्याचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे.


तबला स्वरात मिळवण्यासाठी आवश्यक बाबी / गोष्टी खालीलप्रमाणे-


१} स्वर ज्ञान :- तबला वादकास उत्तम स्वर ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यासाठी तबला वादकाने विविध संगीत प्रकारांचा आस्वाद घेणे, तानपुरा, हार्मोनियम ह्यांच्या माध्यमातून स्वरांचा संस्कार करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.


२} सुरेल तबला :- तबला बनवणाऱ्याकडून तबला बनवताना तबल्याची चाट / थाप एकसारखी आहे का हे तपासून घेणे त्याचप्रमाणे तबला आसदार आहे का हेही तपासून घेणे अत्यंत आवश्यक असते. त्याचप्रमाणे तबला सुरेल राहण्यासाठी तबल्याची नियमित ओढ काढून घेणे आवश्यक असते.



तबला स्वरात लावण्याचे नियम खालीलप्रमाणे-


१} तबला कोणत्या स्वरात मिळवायचा आहे हे प्रथम पाहावे लागते. स्वतंत्र वादनासाठी आपण स्वतःचा तबला घेऊन जातो. परंतु साथ संगत करताना मुख्य कलाकाराचा स्वर कोणता आहे हे विचारून त्या स्वराचा तबला नेणे आवश्यक आहे.


२} हार्मोनियमच्या किंवा मुख्य गायकाच्या 'षड्ज' या स्वरमध्ये तबला मिळवला जातो. शक्यतो तबला तानपुऱ्यावर लावावा कारण तानपुऱ्यातून षडजाची एकसंध आस मिळत राहते.


३} षड्ज स्वर नीट ऐकून झाल्यावर तबल्याची चाट वाजवून तबल्याचा स्वर, षड्जापेक्षा कमी किंवा जास्ती (खाली अथवा वर) आहे का ते पाहून घ्यावे.


४} स्वरांमधला हा फरक अर्धा स्वर अथवा त्यापेक्षा अधिक असल्यास तो गट्ठ्यांच्या साहाय्याने कमी-जास्त करावा. स्वर कमी असल्यास गट्ठे हातोडीच्या साहाय्याने वरन खालच्या दिशेला ठोकून घ्यावेत आणि स्वर जास्ती असल्यास ते गट्ठे खालून वरच्या दिशेला ठोकून घ्यावेत. तबला लावतांना तबल्याचे आठही गट्ठे एकाच पातळीत राहणे आवश्यक असते. त्यामुळे पुडीवरील ताण एकसमान रहातो.


५} गट्ठ्यांच्या सहाय्याने तबल्याचा स्वर षड्जाच्या जवळ आल्यावर फाईन ट्युनिंग, गजऱ्याच्या सहाय्याने करावे. स्वर कमी असेल तर गजरा हातोडीने वरच्या बाजूला ठोकावा व स्वर जास्त असेल तर गजरा खालून वरच्या दिशेने ठोकावा.


६} गजऱ्याच्या सहाय्याने तबला स्वरात मिळवताना समोरासमोरील घरे अगोदर मिळवून घ्यावीत. तबल्यावर एकूण सोळा घरे असतात. गजऱ्याच्या सहाय्याने तबला लावताना १-९, ५-१३ अशा क्रमांकांची समोरासमोरील घरे स्वरात मिळवून घ्यावीत.


७} तबला प्रथम पूर्णतः चाटेवर लावून घ्यावा आणि नंतर लवेमध्ये तबला मिळवून घ्यावा.


८} तबला पूर्णपणे लावून झाल्यानंतर त्यातील सर्वोत्तम घर कोणते हे तपासून वादनास प्रारंभ करावा.

Recent Posts

See All

'बायाँ' च्या वादनात संतुलन राखण्यासाठी रियाजाची पद्धत

तबला हे वाद्य दायाँ (तबला) आणि बायाँ (डग्गा) या दोन वाद्यांचा मेळ साधून निर्माण झालेले वाद्य आहे. तबल्यातून (दायाँ) निघालेले 'तार-स्वर'...

पेशकार, कायदा तसेच रेला यांचे एकल तबला वादनातील स्थान आणि महत्व

तबला हे तालवाद्य, सर्व तालवाद्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असण्याचे कारण म्हणजे, तबला हे तालवाद्य सर्वाधिक विकसित व उपयोगी आहे. या...

पढंतची आवश्यकता -

स्वतंत्र तबलावादनाच्या सादरीकरणामध्ये 'पढंत'चे स्थान महत्वपूर्ण आहे. या सादरीकरणामध्ये प्रथम वाचेद्वारे वाचून नंतर त्याचं सादरीकरण (पेश...

Comments


bottom of page