top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

शास्त्रीय संगत


किराणा, जयपूर, आग्रा, ग्वाल्हेर, भेंडीबाजार, कापूरथाला, कसूर, पटियाला व मेवाती या शास्त्रीय संगीतातील घराण्यांच्या शैलीनुसार त्या त्या घराण्याच्या गायकीला अनुरूप अशी साथ किंवा संगत अथवा साथ-संगत तबलावादकाला करावी लागते. बडा ख्यालामध्ये शेवटच्या दोन मात्रांत किंवा काही लघुंमध्ये भाषेचा भरणा केला जातो. ख्याल गायनात अशा भाषेचा भरणा करून व शेवटच्या मात्रेमध्ये लयकारी करून पुन्हा बंदिशीच्या आरंभ बिंदूवर म्हणजेच मुखड्यावर येणे कौशल्याचे असते.


ख्याल गायनात विलंबित वा द्रुत लयीमध्ये जे ठेके वाजविले जातात, त्यांचे ढोबळमानाने काही गुणधर्म ठरलेले आहेत, ते खालील प्रमाणे :-



ठेक्याचे गुणधर्म -


i) स्वरेल ठेका - चाटे वरची अक्षरं, लवे वरची अक्षरं व शाई वरची अक्षरं यांतून निघणाऱ्या नादांची आस आणि शाई वरच्या अक्षरांचे (तिट, तिरकिट) वजन प्रमाणबद्ध असावं.

उदा. नाना मुळे यांचा ठेका स्वरेल असतो.


ii) लयदार ठेका - बंदिशींची लय व गायकास अपेक्षित असणारी लय यांची सांगड घालून, लय शोधून वाजविणे आणि ती लय टिकवून ठेवणे म्हणजेच 'लयदार' ठेका वाजविणे होय.

उदा. नदीचा प्रवाह जसा एकसंथ, सरळ लयीत वाहतो, त्याप्रमाणे.

पंडित किशन महाराज यांचा ठेका लयदार असतो.


iii) वजनदार ठेका - प्रत्येक अक्षराचं व ठेक्याचं वजन, त्याचबरोबर डग्ग्यावरील काम ( घिसकाम, मिंडकाम, घुमारा ) यांनाही तितकेच महत्व आहे. तबला हा स्वर निर्मिती करतो, तर डग्गा घुमारा, आस यांची निर्मिती करून तबल्याच्या स्वरास पोषक असलेली गंभीरता निर्माण करतो. त्यामुळे ठेक्याला जो वजनदारपणा आणि जे वजन प्राप्त होते, त्यास 'वजनदार' ठेका असे म्हणतात.

उदा. वसंत आचरेकर यांचा ठेका वजनदार असतो.


iv) लयकार ठेका - आग्रा, ग्वाल्हेर अशा लय प्रधान घराण्याच्या गायकीबरोबर स्वरेल, वजनदार ठेक्याबरोबरच लयकार व लयदार ठेक्यांची गरज असते. या गायकीमध्ये साथ व संगत या दोन्ही गोष्टींचा अंतर्भाव होतो. साथ करताना, 'काँट्रास्ट' (विरुद्ध) ठेका तर संगत करताना लयकार ठेका वाजविला जातो. 'गायकाच्या बरोबरीने निघणे' हा आग्रा-ग्वाल्हेर गायकीचा अविभाज्य घटक आहे. कारण ही दोन्ही घराणी लय-प्रधान आहेत.


i) बोल-आलापी - पेशकार अंगाने संगत.

ii) बोल-सरगम-ताना : - कायदा अंगाने संगत.

उदा. धाs धाती धागेना, कडधाती धागेना इ.

iii) ताना - रेला अंगाने संगत.

उदा. धिनगिन तक, धिन धिनागिन, धा तिरकिटतक इ.


अशाप्रकारे वेगवेगळ्या बोल समुहांचा वापर करून साथ-संगत केली जाते.

Recent Posts

See All

वाद्यसंगीताची साथसंगत -

१) गायकी अंग व तंतकारी अंग या दोन्ही प्रकारांची माहिती २) गायकी अंगात ख्यालाप्रमाणेच साथ परंतु हाताची तयारीसुद्धा अपेक्षित ३) तंतकारी...

ख्यालाची साथसंगत -

१) नादमय, सशक्त आणि आसदार ठेका २) लयदारी ३) बडा व छोटा ख्याल यांच्या मांडणीचा अभ्यास. (ठेकापूर्व आलाप, नोमतोम, मुखडा, सम, बंदिशीची लय,...

Comments


bottom of page