top of page

सांगता

  • Writer: Team TabBhiBola
    Team TabBhiBola
  • Oct 19, 2020
  • 1 min read

Updated: Jan 29, 2021

अशाप्रकारे सध्याच्या काळात 'तबला' या वाद्याला अतिशय प्रसिद्धी मिळाली आहे. आजच्या आधुनिक युगात शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, चित्रपट संगीत, सुगम संगीत, पाश्चात्त्य संगीत इ. सर्व प्रकारच्या संगीतामध्ये तबल्याची साथ, अतिशय प्रभावीपणे होत असलेली आपल्याला दिसून येते.


तबला हे एकच वाद्य असे आहे की, कोणत्याही चर्म वाद्याचा बाज या वाद्यावर आपण सहजतेने निर्माण करू शकतो, म्हणजेच तबला हे वाद्य इतर कोणत्याही वाद्याला पर्याय (रिप्लेसमेंट) देऊ शकते. ढोलक-ढोलकी, पखवाज एवढेच नव्हे तर पाश्चात्त्य संगीतातील काँगो-बॉंगो यांचे नाद सुद्धा तबल्यावर सहजपणे काढता येतात. तर फ्यूजन सारख्या संगीत प्रकारांमध्येही तबल्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असलेला दिसून येतो. हेच या वाद्याचे वैशिष्ट्य आणि म्हणूनच मोठेपण आहे.


मृदंग वा पखवाजास तबल्याचा 'बाप' म्हंटले जाते, परंतु 'बाप से बेटा सवाई' या म्हणीप्रमाणे 'तबला' आजच्या काळात संगीतामध्ये अग्रणी असे वाद्य ठरले आहे. आज अनेक कलाकार साथ - संगती बरोबरच, स्वतंत्र तबला वादनाचे कार्यक्रम यशस्वीपणे सादर करीत आहेत. आज तबल्याच्या स्वतंत्र वादनास एक प्रतिष्ठा लाभलेली आहे. खास करून, एक चांगला रसिक-वर्ग या कलेकडे चांगल्या दृष्टिकोनातून पाहू लागला आहे.

Recent Posts

See All
तबल्याचे आधुनिक परिवर्तन

१) पूर्वी तबल्यासाठी एकाच जाड चामड्याचा वापर केला जात होता. परंतु पुढे एका जाड चामड्याऐवजी दोन पातळ चामड्याचा वापर करण्यात येऊ लागला....

 
 
 

Comentários


bottom of page