top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

संगीत प्रकार व त्यासाठी वापरले जाणारे तबले


तबला या वाद्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्या त्या संगीत प्रकारांनुसार सर्व स्वरांचे तबले उपयोगात आणता येतात.


विविध संगीत प्रकार व त्यासाठी वापरले जाणारे तबले खालीलप्रमाणे ;


१} शास्रीय संगीत :- शास्रीय संगीतात ख्याल गायन सादर केले जाते. हे गायन स्री व पुरुष असे दोनही कलाकार सादर करतात. स्री कलाकार सर्वसाधारणपणे काळी-४, पांढरी-६ व काळी-५ या स्वरांमध्ये गायन ( ख्याल ) सादर करतात. त्यांच्या साथीला या पट्ट्यांचे / स्वरांचे तबले वाजविले जातात. पुरुष कलाकार काळी-१, पांढरी-२, काळी-२, पांढरी-३ या स्वरांमध्ये गायन ( ख्याल ) सादर करतात. त्यामुळे त्यांच्या साथीला या पट्ट्यांचे / स्वरांचे तबले वाजविले जातात. काही कलाकार याच स्वरांचे टिपेचे तबले देखील साथीला घेतात. काही कलाकार बडा ख्यालाबरोबर स्वराचा तर छोट्या ख्यालाबरोबर टिपेच्या तबल्याची मागणी करतात.


२} उपशास्रीय संगीत :- उपशास्रीय संगीतात ठुमरी, गझल, टप्पा, दादरा इ. गान-प्रकार सादर केले जातात. यामध्ये स्री कलाकारांच्या साथीला काळी-४, पांढरी-६, काळी-५ हे तबले तर पुरुष कलाकारांच्या साथीला काळी-१, पांढरी-२, काळी-२, पांढरी-३ या स्वरांच्या टिपेचे तबले वाजविले जातात.


३} भक्ती संगीत :- भक्ती संगीतात दोन्ही प्रकारचे म्हणजेच स्वराचे व टिपेचे तबले वापरले जातात. जर अभंग / भजनाबरोबर साथीला पखवाज वाद्य असेल तर त्याच्या जोडीला टिपेचा तबला वापरला जातो.


४} सुगम संगीत :- या संगीत प्रकारामध्ये मात्र गाण्याच्या गरजेनुसार तबले लागत असल्यामुळे सर्वच प्रकारच्या स्वरांचे तबले वाजविले जातात.


५} वाद्य संगीत :- शास्रीय संगीताचे सादरीकरण सतार, सरोद, बासरी, व्हायोलिन, सारंगी, संतूर इ. वाद्यांच्या माध्यमातूनही केले जाते. हे सादरीकरण गायकी अंग किंवा तंतकारी अंग अशा दोन पद्धतीने केले जाते. गायकी अंगाने सादर होणाऱ्या वाद्य वादनास स्वराचे अथवा टिपेचे तबले, कलाकाराच्या मागणीनुसार वापरले जातात. तर तंतकारी अंगासाठी मात्र टीपेच्याच तबल्याचा वापर केला जातो.


६} नृत्य संगत :- कत्थक नृत्याच्या साथीसाठी टिपेचा तबला वापरला जातो.

Recent Posts

See All

वाद्यसंगीताची साथसंगत -

१) गायकी अंग व तंतकारी अंग या दोन्ही प्रकारांची माहिती २) गायकी अंगात ख्यालाप्रमाणेच साथ परंतु हाताची तयारीसुद्धा अपेक्षित ३) तंतकारी...

ख्यालाची साथसंगत -

१) नादमय, सशक्त आणि आसदार ठेका २) लयदारी ३) बडा व छोटा ख्याल यांच्या मांडणीचा अभ्यास. (ठेकापूर्व आलाप, नोमतोम, मुखडा, सम, बंदिशीची लय,...

Comments


bottom of page