top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

साथ-संगतीचे सर्वसाधारण नियम


१) माहिती - ज्या संगीत प्रकाराची साथ-संगत करावयाची आहे, त्या संगीत प्रकाराची संपूर्ण माहिती असणे आवश्यक्य असते.


२) स्वर ज्ञान - मुख्य कलाकार कोणत्या स्वरात सादरीकरण करणार आहे, त्यानुसार तबल्याची निवड करून तो तबला उत्तम प्रकारे स्वरात मिळवण्यासाठी स्वर ज्ञान असणे आवश्यक असते.


३) लय व लयकारी ज्ञान - मुख्य कलाकारास अभिप्रेत असलेली लय, तालाच्या माध्यमातून कायम राखणे, तसेच तो कलाकार जेंव्हा लयकारीयुक्त सादरीकरण करीत असेल तेव्हा त्यास अनुरूप साथ संगत करणे आवश्यक असते. यासाठी तबला संगतकारास लयकारीचे सखोल ज्ञान व लयीवर प्रभुत्व मिळवणे आवश्यक असते.


४) संयम - साथ-संगत करण्यात सर्वात महत्वाचा गुण / नियम म्हणजे संयम. आपल्या वादनातून मुख्य कलाकाराचे सादरीकरण खुलवणे, ही तबला संगतकाराची मुख्य जबाबदारी असते. साथ-संगतीच्या ओघात, स्वतंत्र वादनासारखे दीर्घकाळ वादन टाळणे गरजेचे असते. मुख्य कलाकाराने संधी दिल्यावरच, संगतीस पोषक, मिळते-जुळते व थोडक्यात स्वतंत्र वादन करणे आवश्यक असते.


५) तालीम - ज्या संगीत प्रकाराची साथ संगत करायची आहे, त्या संगीत प्रकारातील चांगल्या कलाकारांबरोबर, गुरूंच्या मार्गदर्शनाखाली नियमितपणे सराव करणे, अत्यंत आवश्यक असते.


६) श्रवण - उत्तम संगतकार होण्यासाठी त्या त्या संगीत प्रकारांचे श्रवण करणे आवश्यक असते. या श्रवणातूनच साथ-संगतीचे खरे संस्कार घडत असतात.

Recent Posts

See All

वाद्यसंगीताची साथसंगत -

१) गायकी अंग व तंतकारी अंग या दोन्ही प्रकारांची माहिती २) गायकी अंगात ख्यालाप्रमाणेच साथ परंतु हाताची तयारीसुद्धा अपेक्षित ३) तंतकारी...

ख्यालाची साथसंगत -

१) नादमय, सशक्त आणि आसदार ठेका २) लयदारी ३) बडा व छोटा ख्याल यांच्या मांडणीचा अभ्यास. (ठेकापूर्व आलाप, नोमतोम, मुखडा, सम, बंदिशीची लय,...

Comments


bottom of page