top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

प्रस्तावना - पंडित भातखंडे आणि पंडित पलुस्कर ताल-लिपी पद्धतींची सविस्तर माहिती


ताल लिपी वा बोल लिपी :- तबल्यातील ताल, तालासंबंधीचे बोल-कायदे, रेले, तुकडे इ., मात्रा, खंड, सम, टाळी, खाली यांच्या विशिष्ट चिंन्हांसहित, त्या संबंधित तालामध्ये कसे रचले गेले आहेत हे लिहिणे व तालांच्या इतर बाबींची माहिती त्यामध्ये लिहिणे, यालाच 'ताल वा बोल' लिपिबद्ध करणे असे म्हणतात.


भारतीय संगीतात स्वर लेखन व ताल लेखन हे अगदी अलीकडच्या म्हणजे विसाव्या शतकाच्या सुरवातीलाच प्रचारात आले. त्यापूर्वी केवळ गुरुमुखातून ऐकून व पाठांतर करुनच आपले संगीत, आपली कला पिढ्यान पिढ्या चालत आलेली आहे. यात एक दोष असा निर्माण झाला की ऐकून वाजविण्यात, पाठांतर करण्यात एखादी गोष्ट राहून गेली अथवा चूक झाली तर ती चूक पिढ्यान पिढ्या तशीच राहून जात असे आणि त्या चुकीचीच एक परंपरा बनून जात असे. भारतीय संगीताच्या स्वरलेखन व ताललेखन पद्धतीत एक अडचण अशी आहे की, भारतीय संगीत हे उत्स्फूर्त संगीत आहे. एखाद्या वादकाने अथवा गायकाने आज जे वाजवले, गायले तेच उद्या गाईल अथवा वाजविल असे नाही. कारण आपले संगीत हे साचेबद्ध नाही. त्यामुळे स्वर लेखन, ताल लेखन हे करणे कठीण जाते. तरीही आजच्या काळात स्वर लेखन, ताल लेखन ही आवश्यक व उपयुक्त बाब मानली जाते.


आज संगीत शिक्षणाचा आणि संगीताच्या परीक्षांचा खूपच प्रचार आणि प्रसार झालेला आहे. त्यासाठी संगीताच्या स्वर लेखनाची व ताल लेखनाची गरज तीव्रतेने भासू लागली आहे. शास्त्रीय संगीतापासून ते विविध प्रकारकांच्या संगीतापर्यंत स्वर-ताल लेखन ही एक आवश्यक बाब झालेली आहे. म्हणून संगीत प्रेमींना आणि अभ्यासकांना स्वर-ताल लेखन येणे अत्यंत आवश्यक आहे.


आज उत्तर भारतीय संगीतात मान्यताप्राप्त, प्रमुख प्रचलित असलेल्या स्वर-ताल लेखनाच्या दोन पद्धती आहेत.,


१} कै. पं. विष्णू दिगंबर पलुस्कर पद्धती


२} कै . पं. विष्णू नारायण भातखंडे पद्धती


या दोन्ही विष्णूद्वयांनी संगीत क्षेत्रात क्रांतिकारी बदल केले. शास्त्र व क्रिया यांचा समन्वय व संगीत विद्यालयांची स्थापना केली. पं. भातखंडे व पं. पलुस्कर यांनी स्वर-ताल लिपीची निर्मिती करून त्यावर अनेक ग्रंथ लिहिले व काळाच्या ओघात लुप्त होणारे संगीत टिकवून ठेवले.


Recent Posts

See All

Comments


bottom of page