प्रश्न-पत्र - ८
- Team TabBhiBola
- Nov 12, 2024
- 2 min read
Updated: Jan 18
प्रश्न-पत्रिका – ८
खालील प्रश्न प्रत्येकी १ गुणांना आहेत.
खालील प्रश्नांची उत्तरं प्रश्न-पत्रिकेच्या शेवटी दिलेली आहेत.
सगळ्या रिकाम्या जागांचे प्रश्न हे, ‘एका वाक्यात उत्तरे लिहा, जोड्या लावा, चूक की बरोबर ते लिहा, योग्य पर्याय निवडा’ यांसाठी देखील उपयुक्त आहेत.
सगळे प्रश्नपत्र हे tabbhibola या वेबसाइट च्या आधारावर तयार केले गेले आहेत.
१] रिकाम्या जागा भरा. (प्रत्येकी १ गुण)
१) तालशास्त्रात ................. व ................. असे दोन प्रकारचे ताल सांगितलेले आहेत.
२) 'काल' मोजण्याचे परिमाण म्हणजे ............... होय.
३) सम, टाळी, काल, मात्रा, विभाग हे निश्चित केलेल्या मात्रांच्या समूहाच्या रचनेस .............. असे म्हणतात.
४) "तालस्तल .................. .................... स्मृतः ।
गीतं ............ तथा ........... यतस्ताले प्रतिष्ठितम" ।।
५) हातानी ताल मोजताना बोटाच्या व तळव्याच्या ज्या विशिष्ट हालचाली होतात त्याला ............... असे म्हणतात.
६) तालात आपण जेव्हा टाळी वाजवितो तेव्हा त्या क्रियेस ............... क्रिया असे म्हणतात.
७) तालात टाळीऐवजी हात बाजूला करून 'काल' दाखविला जातो तेव्हा त्या क्रियेस .............. क्रिया असे म्हणतात.
८) तालाला जेव्हा बोलांचे भरजरी वस्त्र चढविले जाते तेव्हा तो .............. होतो.
९) ठेका हा ........... आवर्तनाचा असतो.
१०) 'पेश करणे' म्हणजे ................. होय.
११) कायदा म्हणजे ............ .
१२) नियमांमध्ये बांधलेली रचना म्हणजे .............. होय.
१३) .................. शब्दबंधांचाच वापर करून कायद्याचा विस्तार केला जातो.
१४) 'दोहरा' म्हणजे .............. .
१५) 'विश्राम' म्हणजे .............. .
१६) 'गतिमानता' हे ................ एक वैशिष्ट्य आहे.
१७) छोट्या बोल समूहांची केलेली अशी रचना जी चौपाटीत वा आठपटीतही सहजतेने वाजविता येते त्यास ................ असे म्हणतात.
१८) समेपूर्वी संपल्यामुळे पुनरावृत्ती करता येणारी व निसर्गातील विविध चालींचा प्रत्यय देणारी बंदिश म्हणजे ............ होय.
१९) 'गत' हे नाव ................ आलेले असावे.
२०) 'गत' ही ................ रचना आहे.
२१) जेव्हा एखाद्या अक्षराची किंवा शब्दाची पुनरावृत्ती करण्यात येते तेव्हा .................... हा अलंकार निर्माण होतो.
२२) 'यति' म्हणजे ................ होय.
२३) 'निकास' याचा शब्दशः अर्थ .............. ................ .............. असा होतो.
२४) 'उपज' म्हणजे ............. .
२५) 'रेला' हा ........... भाषेतील एक शब्द आहे ज्याचा अर्थ .............. असा होतो.
उत्तरे -
१) मार्गी ताल, देशी ताल २) 'मात्रा' ३) 'ताल' ४) प्रतिष्ठायामिती धतोर्घजी, वाद्यं नृत्यं ५) 'क्रिया' ६) सशब्द ७) निःशब्द ८) ठेका ९) एका १०) 'पेशकार' ११) 'नियम' १२) 'कायदा' १३) मुखातील १४) 'दोहराना' १५) 'विश्रांती' (Pause) १६) रेल्याचे १७) 'रेला' १८) 'गत' १९) गतीवरुन / चालीवरुन २०) विस्तारक्षम २१) 'अनुप्रास' २२) 'विराम' २३) 'बाहेर पडण्याचा मार्ग' २४) 'उपजणे' (निर्माण होणे) २५) पंजाबी, 'प्रवाह'
Recent Posts
See Allप्रश्न-पत्रिका – १० खालील प्रश्न प्रत्येकी १ गुणांना आहेत. खालील प्रश्नांची उत्तरं प्रश्न-पत्रिकेच्या शेवटी दिलेली आहेत. सगळ्या...
प्रश्न-पत्रिका – ९ खालील प्रश्न प्रत्येकी १ गुणांना आहेत. खालील प्रश्नांची उत्तरं प्रश्न-पत्रिकेच्या शेवटी दिलेली आहेत. सगळ्या...
प्रश्न-पत्रिका – ७ खालील प्रश्न प्रत्येकी १ गुणांना आहेत. खालील प्रश्नांची उत्तरं प्रश्न-पत्रिकेच्या शेवटी दिलेली आहेत. सगळ्या...
Comments