प्रश्न पत्र - १०
- Team TabBhiBola
- Nov 13, 2024
- 2 min read
Updated: Jan 18
प्रश्न-पत्रिका – १०
खालील प्रश्न प्रत्येकी १ गुणांना आहेत.
खालील प्रश्नांची उत्तरं प्रश्न-पत्रिकेच्या शेवटी दिलेली आहेत.
सगळ्या रिकाम्या जागांचे प्रश्न हे, ‘एका वाक्यात उत्तरे लिहा, जोड्या लावा, चूक की बरोबर ते लिहा, योग्य पर्याय निवडा’ यांसाठी देखील उपयुक्त आहेत.
सगळे प्रश्नपत्र हे tabbhibola या वेबसाइट च्या आधारावर तयार केले गेले आहेत.
१] रिकाम्या जागा भरा. (प्रत्येकी १ गुण)
१) तानपूरा या वाद्याला ............... असेही म्हणतात.
२) तंबोऱ्याच्या भोपळ्याला .............. असे म्हणतात.
३) तंबोरा ह्या वाद्याचे ............ व ............ असे दोन मुख्य अवयव असतात.
४) भोपळ्याच्या चपट्या भागावर जी लाकडी तबकडी बसविलेली असते त्यास ............ असे म्हणतात.
५) तबलीपासून अंदाजे दोन बोटे उंच चौकोनी आकाराचा ब्रिज बसविलेला असतो. या ब्रिजला ........... असे म्हणतात.
६) तंबोऱ्याच्या घोडीपासून खाली येणारी, तारा घालण्यासाठी चार छिद्र असलेली एक हस्तिदंताची पट्टी बसविलेली असते, तिलाच .............. असे म्हणतात.
७) तंबोऱ्याचा भोपळा व दांडी जेथे जोडलेली असते त्या भागास ............. वा ............. असे म्हणतात.
८) पट्टीच्या मागे, खुंटीकडील बाजूकडे एक ते दिड इंच अंतरावर एक पट्टी असते. या पट्टीला चार छिद्रे असतात, या पट्टीलाच ............ असे म्हणतात.
९) तंबोऱ्याच्या तारा स्वरात लावण्याच्या वेळी त्यांचा स्वर कमी-जास्त करण्यासाठी .............. उपयोग होतो.
१०) तंबोऱ्याची घोडी व तारदान यांमधील उताराच्या जागेवर तारांमधून ओवलेले चार ............ असतात.
११) तारा स्वरात लावण्याच्या वेळी अचूक स्वर मिळविण्यासाठी ............. उपयोग होतो.
१२) स्वरातील अखंडपणा टिकवून ठेवण्यासाठी ................. या वाद्याचा उपयोग होतो.
१३) हार्मोनिअम हे एक सुप्रसिद्ध ............ वाद्य आहे. या वाद्याला मराठीत ................. असे म्हणतात.
१४) ............. या शब्दापासून ‘हार्मोनिअम’ असे नाव या वाद्याला पडले आहे.
१५) हार्मोनिअममधील आवाज हा रीडवर ............. दाब पडल्याने उत्पन्न होतो.
१६) स्वरपट्ट्यांच्या स्टॉपर्सच्या बाजूने असलेल्या स्वरपट्ट्यांनाच ............... असे म्हणतात.
१७) सनई हे एक ............. वाद्य असून मराठीत ............. तर हिंदी भाषेत त्याला .................. असे म्हणतात.
१८) सनई या वाद्याला ............. वा ................. या नावांनीही ओळखले जाते.
१९) 'सनई' हे भारतीय ............. आहे.
२०) 'सनई' हे वाद्य ............ भागात विभागले गेले आहे.
२१) दक्षिण भारतातही सनई सारखे एक वाद्य आहे. सनईपेक्षा थोड्या लांब असलेल्या त्या वाद्याला ................. या नावाने ओळखले जाते.
२२) 'सनई' या वाद्याचा उपयोग लग्नकार्यामध्ये ................... निर्मिती करण्यासाठी होतो.
२३) 'सनई' या वाद्याच्या साथीला ............... हे वाद्य वाजविले जाते.
२४) 'चौघडा' हे एक ............ वाद्य आहे.
२५) 'चौघडा' हे वाद्य ............... वाजविले जाते.
उत्तरे -
१) तंबोरा २) 'तुंबा' ३) तुंबा व दांडी ४) ‘तबली’ ५) 'घोडा' ६) ‘तारदान’ ७) ‘सांधा’ वा ‘गुल’ ८) ‘तारगहन’ ९) खुंटयांचा १०) मणी ११) मण्यांचा १२) तानपूरा / तंबोरा १३) सुषिर, संवादिनी १४) ‘हार्मोनी’ १५) हवेचा १६) ‘की-बोर्ड’ १७) सुषिर, 'सनई', 'शेहनाई' १८) 'नफिरी' वा 'सुंदरी' १९) 'मंगलवाद्य' २०) चार २१) 'नागस्वरम्' २२) मंगलध्वनीची २३) 'चौघडा' २४) चर्म/ताल/अवनद्ध २५) काठ्यांनी
Recent Posts
See Allप्रश्न-पत्रिका – ९ खालील प्रश्न प्रत्येकी १ गुणांना आहेत. खालील प्रश्नांची उत्तरं प्रश्न-पत्रिकेच्या शेवटी दिलेली आहेत. सगळ्या...
प्रश्न-पत्रिका – ८ खालील प्रश्न प्रत्येकी १ गुणांना आहेत. खालील प्रश्नांची उत्तरं प्रश्न-पत्रिकेच्या शेवटी दिलेली आहेत. सगळ्या...
प्रश्न-पत्रिका – ७ खालील प्रश्न प्रत्येकी १ गुणांना आहेत. खालील प्रश्नांची उत्तरं प्रश्न-पत्रिकेच्या शेवटी दिलेली आहेत. सगळ्या...
Comments