प्रश्न-पत्र - १
- Team TabBhiBola
- Dec 17, 2023
- 2 min read
Updated: Jan 18
प्रश्न-पत्रिका – १
खालील प्रश्न प्रत्येकी १ गुणांना आहेत.
खालील प्रश्नांची उत्तरं प्रश्न-पत्रिकेच्या शेवटी दिलेली आहेत.
सगळ्या रिकाम्या जागांचे प्रश्न हे, ‘एका वाक्यात उत्तरे लिहा, जोड्या लावा, चूक की बरोबर ते लिहा, योग्य पर्याय निवडा’ यांसाठी देखील उपयुक्त आहेत.
सगळे प्रश्नपत्र हे tabbhibola या वेबसाइट च्या आधारावर तयार केले गेले आहेत.
१] रिकाम्या जागा भरा. (प्रत्येकी १ गुण)
१. तबल्याच्या तोंडावर ............ कमावलेले कातडे बसवितात.
२. तबल्याच्या तोंडावर बकरीचे कमावलेले कातडे, वादीच्या सहाय्याने घट्ट ताण
देऊन बसवितात त्यास .............. असे म्हणतात.
३. वादी पुडीच्या ............ घरातून विणून बसवितात.
४. पुडीचा सर्वात वरचा थर कापून त्याची ............ बनते.
५. शाई, मैदान, किनार, आणि गजरा मिळून ............ बनते.
६. तबल्याच्या तळाशी एक गोलाकार वादीचे कडे असते त्यास ........ असे
म्हणतात.
७. वादी ही तबल्याच्या ............ या भागातून ओवून घेतली जाते.
८. तबल्याच्या वादीमध्ये बसविलेल्या गोलाकार ठोकळ्यांना ......... असे
म्हणतात.
९. गट्ठयाची संख्या .............. ही निश्चित असते.
१०. तबल्याच्या पुडीच्या मध्यभागी घोटून लावण्यात येणाऱ्या मिश्रणास ..............
असे म्हणतात.
११. .............. ही तबल्याच्या पुडीच्या मध्यभागी घोटून लावतात.
१२. शाईचा महत्वाचा उपयोग .............. होतो.
१३. स्वर-निर्मितीसाठी ................ महत्वाचा उपयोग होतो.
१४. गट्ठे खाली-वर ठोकल्याने पुडीवरील ताण ............ होतो.
१५. डग्ग्याचा पत्रा जेवढा जाड तेवढे भांड्याचे वजन ............. .
१६. डग्ग्याची वादी खेचून धरण्यासाठी लाकडी गट्ठ्यांऐवजी ........ वापर करतात.
१७. तबला म्हणजे ............ तर डग्गा म्हणजे ............. .
१८. तबल्याच्या मुळाक्षरांना तबल्याचे ................ असे म्हणतात.
१९. संस्कृत मधील .......... मुळाक्षरांचा उपयोग करून तबल्यातील वर्ण तयार
झालेले आहेत.
२०. उजव्या हाताच्या तर्जनीने तबल्याच्या चाट/किनारीवर आघात करून जो
गुंजयुक्त नाद निर्माण होतो त्यास .............. असे म्हणतात.
२१. ‘क’,’ट’,’ती’,’र’ या बंद नादांना .............. असे म्हणतात.
२२. ‘धा’,’धिं’,’तिं’,’दिं’ या खुल्या नादांना .............. असे म्हणतात.
२३. ‘रियाज’ करणे हा तबला वादकाचा .......... आहे तर ‘रियाज’ न करणे हा
तबला वादकाचा .......... आहे.
२४. तबला वादकाला आपला तबला .............. मिळविता येणे अत्यंत आवश्यक
असते.
२५. तबला स्वरात मिळविण्यासाठी .............. वापर केला जातो.
उत्तरं –
१. बकरीचे २. पुडी ३. १६/सोळ ४. चाटी/किनार ५. पुडी
६. पेंदे/पेंदी ७. पेंदे/पेंदी ८. गठ्ठे ९. ८/आठ १०. शाई
११. शाई १२. स्वर निर्मितीसाठी १३. शाईचा १४. कमी/जास्त १५. जास्त
१६. खिट्ट्यांचा १७. दायाँ व बायाँ १८. वर्ण १९. दहा/१० २०. ना/ता
२१. व्यंजनाक्षरे २२. स्वराक्षरे २३. गुण व दोष २४. स्वरात २५. हातोडीचा
Recent Posts
See Allप्रश्न-पत्रिका – १० खालील प्रश्न प्रत्येकी १ गुणांना आहेत. खालील प्रश्नांची उत्तरं प्रश्न-पत्रिकेच्या शेवटी दिलेली आहेत. सगळ्या...
प्रश्न-पत्रिका – ९ खालील प्रश्न प्रत्येकी १ गुणांना आहेत. खालील प्रश्नांची उत्तरं प्रश्न-पत्रिकेच्या शेवटी दिलेली आहेत. सगळ्या...
प्रश्न-पत्रिका – ८ खालील प्रश्न प्रत्येकी १ गुणांना आहेत. खालील प्रश्नांची उत्तरं प्रश्न-पत्रिकेच्या शेवटी दिलेली आहेत. सगळ्या...
Comments