top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

पेशकारातील 'उपज'


स्वतंत्र तबला वादकांची प्रतिभा ही विस्तारक्षम रचनांमध्ये आणि त्यातही खास करून 'पेशकारामध्ये' अनुभवास मिळते.


१) पेशकारातील उपज - तबला वादनातील इतर कोणत्याही रचनाप्रकारापेक्षा कलाकाराची उपज प्रतिभा ही पेशकारात दिसून येते. याची कारणे खालीलप्रमाणे -


i ) पेशकार ही विस्तारक्षम रचना आहे.


ii ) तबला वादनातील सर्व अक्षरे (वर्ण), बोल पेशकारात वाजविण्याची मुभा असते.


iii ) इतर विस्तारक्षम रचनांप्रमाणे पेशकार वादन एकाच जातीत, लयीत न चालता त्यात आपण विविध जाती, लय बदल करू शकतो.


i ) विस्तारक्षम रचना - 'पेशकार' म्हणजे धीम्या (विलंबित) लयीत प्रस्तुत होणारी, डगमगत्या लयीत चालणारी, नाद-लय यांच्या विविध रूपांच्या निर्मितीला मुभा देणारी, खाली-भरी युक्त, विस्तारक्षम आणि स्वरमय अंत्यपद असणारी आकर्षक रचना होय. 'पेशंकरा'चा विस्तार हा अमर्याद आहे. याचा विस्तार विलंबित लयीपासून ते द्रुत लयी पर्यंत होतो. हा विस्तार कुठल्या लयीत किती करावा हे त्या त्या कलाकाराच्या हाताच्या व बुद्धीच्या क्षमतेनुसार, तसेच त्या वेळेच्या वृत्ती (मूड) वर अवलंबून असते. या विस्तार क्रियेस, ऊर्ध्वगामी लयकारींचे बंधन सोडल्यास कोणतेही बंधन / मर्यादा नसते. म्हणून पेशकारात 'उपज' या क्रियेस खूप मोठा वाव आहे.


ii ) सर्व बोल वाजविण्याची मुभा - पेशकार वादनात ऊर्ध्वगामी लयकारीच्या माध्यमातून जो विस्तार होतो, त्या विस्तारात शब्दबंध वापराचे कायद्याप्रमाणे बंधन नसते. त्यामुळे तबला वादनातील विविध शब्दांचे नाद, आकार आणि स्वर-व्यंजनाचे सौष्ठव (वजन) यांचा पुरेपूर वापर कलाकारास करता येतो व त्यामुळे पेशकारात 'उपज' या क्रियेस वाव मिळतो.


iii ) जाती बदलाचे स्वातंत्र्य - कायद्याप्रमाणे पेशकार हा एकाच जातीमध्ये (उदा. तीस्त्र, चतुस्त्र, खंड इ.) न वाजता मूळ रचनेच्या जातीमध्ये बदल करण्याचे स्वातंत्र्य पेशकाराचा विस्तार करताना असते. लय, जाती बदलामुळे चमत्कृती निर्माण होते व त्या माध्यमातूनच कलाकार, पेशकारात 'उपज' करू शकतो.

गणित, लयकारी, लघू लयीचा अभ्यास, हाताची तयारी व विविध शब्दबंधांवरील प्रभुत्व, या गोष्टी 'उपज' करणाऱ्या कलाकारांमध्ये असणे अत्यावश्यक असते. परंतु ज्या कलाकारांमध्ये या सर्व गोष्टी आहेत, त्याला उपज करता येईलच असे नाही. कारण, 'उपज' करण्यासाठी काही विशिष्ठ गुणवत्ता अंगी असणे महत्वाचे असते. उदा.


१) धाडस - मनामध्ये काही नवीन कल्पना आल्यास त्या प्रत्यक्षात वाजवण्याचे धाडस कलाकारास असणे आवश्यक असते.


२) अभ्यास - अन्य उत्तम उपज करणाऱ्या कलाकारांच्या व्यक्तिमत्वाचा जवळून अभ्यास करण्याची वृत्ती असणे आवश्यक असते.


३) सहवास - प्रतिभावान कलाकारांचा सहवास मिळणे आवश्यक असते.


४) आस्वाद - मुख्य कलेव्यतिरिक्त अन्य कला, साहित्य, क्रीडा यांचाही आस्वाद घेण्याची वृत्ती असणे आवश्यक असते.


५) दृष्टिकोन - एकंदरीत कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक आणि पूर्वग्रहरहित असणे आवश्यक असते.

Recent Posts

See All

'बायाँ' च्या वादनात संतुलन राखण्यासाठी रियाजाची पद्धत

तबला हे वाद्य दायाँ (तबला) आणि बायाँ (डग्गा) या दोन वाद्यांचा मेळ साधून निर्माण झालेले वाद्य आहे. तबल्यातून (दायाँ) निघालेले 'तार-स्वर'...

पेशकार, कायदा तसेच रेला यांचे एकल तबला वादनातील स्थान आणि महत्व

तबला हे तालवाद्य, सर्व तालवाद्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असण्याचे कारण म्हणजे, तबला हे तालवाद्य सर्वाधिक विकसित व उपयोगी आहे. या...

पढंतची आवश्यकता -

स्वतंत्र तबलावादनाच्या सादरीकरणामध्ये 'पढंत'चे स्थान महत्वपूर्ण आहे. या सादरीकरणामध्ये प्रथम वाचेद्वारे वाचून नंतर त्याचं सादरीकरण (पेश...

Comments


bottom of page