top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

पंडित कंठे महाराज


१} जन्म आणि बालपण :- बनारस घराण्याचे श्रेष्ठ तबला वादक पंडित कंठे महाराज यांचा जन्म इ.स. सुमारे १८८० साली बनारस येथे झाला. पंडित भैरो सहाय यांचे पुत्र पंडित बलदेव सहाय यांच्याकडे त्यांची तालीम लहानपणापासूनच सुरू झाली.


२} प्रगत शिक्षण :- पंडित बलदेव सहाय यांचेकडे त्यांच्या शिक्षणाची तीन वर्षे पूर्ण होत असतानाच पंडित बलदेव सहाय यांना नेपाळच्या राजांचे निमंत्रण आल्याने ते नेपाळला गेले व तिथेच स्थायिक झाले. पंडित कंठे महाराजांना गुरु आणि तालीम ह्यांचा विरह सहन न झाल्याने तेसुद्ध नेपाळला जाऊन राहिले. तेथे पुढील चार वर्षे बलदेव सहायजींनी त्यांच्याकडून अविश्रांत मेहनत करून घेऊन त्यांना तयार केले.


३} वादन वैशिष्ट्ये :- बनारस बाजातील गत, परण व छंदांमध्ये पंडित कंठे महाराजांनी भरपूर मेहनत घेतली. हे प्रकार त्यांच्या खूप आवडीचे होते. भारतात झालेल्या विविध संगीत संमेलनांमधे तबला वादन करून त्यांनी खूप कीर्ती मिळवली होती. खूप उतार वयातसुद्धा ते उत्तम प्रकारे तबला वादन करीत असत.


४} शिष्य :- त्यांच्या शिष्यांमध्ये त्यांचे पुतणे सुप्रसिद्ध तबला वादक पंडित किशन महाराज आणि आशुतोष भट्टाचार्य हे खास उल्लेखनीय आहेत.


५} मृत्यू :- १ ऑगस्ट १९६९ रोजी वयाच्या ८९व्या वर्षी ते स्वर्गवासी झाले. आपला तबला हे एक मोक्षप्राप्तीचे सुलभ साधन आहे अशी त्यांची श्रद्धा होती. अगदी आसन्नमरणावस्थेत त्यांनी आपल्या लाडक्या पुतण्याला, पंडित किशन महाराजांना जवळ बोलावून एक गत-परण शिकवली आणि देह सोडला.

Recent Posts

See All

उस्ताद गामे खॉं

१} बालपण आणि शिक्षण :- दिल्ली घराण्याचे सुप्रसिद्ध तबला नवाझ मरहूम उस्ताद छोटे काले खॉं साहेबांचे हे सुपुत्र. वयाच्या पाचव्या वर्षांपासून...

उस्ताद इनाम अली खॉं साहेब

१} जन्म :- उस्ताद ईनाम अली खॉं साहेबांचा जन्म १२ नोव्हेंबर १९२८ रोजी झाला. दिल्ली घराण्याचे मशहूर तबला नवाझ उस्ताद गामे खॉं साहेबांचे हे...

תגובות


bottom of page