top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

नृत्याची साथ-संगत

नृत्याची साथ-संगत करताना वादकांच्या कलागुणांना व प्रतिभेला अधिक वाव मिळतो. नृत्याची साथ करणे तसे कठीणच असते. नृत्याच्या साथीसाठी वापरले जाणारे तुकडे, चक्रदार, तबलावादकाला तयारीने सादर करावे लागतात. नृत्यकार-पदन्यास जे बोल काढतो तेच बोल किंवा त्याच लयकारीचे अन्य बोल वाजविले जातात. नृत्यात आडी-बिआडी-कुआडी अशा विविध लयकारींचाही वापर होतो, त्यावेळी त्याच लयकारीचे तुकडे वाजवून संगत करणे हे वादकाच्या प्रगल्भ बुध्दीमत्तेचे लक्षण मानले जाते. सखोल अभ्यास, अतिद्रुत लयीत वादन करण्याची क्षमता, लयीवर प्रभुत्व, नव्या रचना तयार करून वाजविण्याची क्षमता, कल्पकता, तालाच्या विविध मात्रांपासून तिहाया, चक्रदार तयार करणे अथवा वाजविणे या गोष्टींची पूर्तता करणे तबलावादकासाठी महत्वाचे असते. नृत्य चालू असेपर्यंत सातत्याने जोरकस वादन चालू ठेवण्याची क्षमताही तबलावादकाकडे असणे आवश्यक असते.


कथक नृत्याची संगत -


१) कथक नृत्य सादरीकरणाची संपूर्ण माहिती. (वंदना, वृत्त, भावपक्ष, तत्कार इ.)


२) खुल्या बाजाने वादन करण्याची क्षमता.


३) हाताची तयारी.


४) उपज.


५) तिहाई अभ्यास.


६) कथक-बोलांच्या भाषेची ओळख आणि ती तबल्यावर भाषांतरीत करण्याचे कौशल्य.


७) अत्युच्च ग्रहणशक्ती.


८) समयसूचकता.


९) सांघिक भावना.


१०) प्रत्यक्ष कलाकारासोबत रियाज.

Recent Posts

See All

वाद्यसंगीताची साथसंगत -

१) गायकी अंग व तंतकारी अंग या दोन्ही प्रकारांची माहिती २) गायकी अंगात ख्यालाप्रमाणेच साथ परंतु हाताची तयारीसुद्धा अपेक्षित ३) तंतकारी...

ख्यालाची साथसंगत -

१) नादमय, सशक्त आणि आसदार ठेका २) लयदारी ३) बडा व छोटा ख्याल यांच्या मांडणीचा अभ्यास. (ठेकापूर्व आलाप, नोमतोम, मुखडा, सम, बंदिशीची लय,...

Comments


bottom of page