top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

मरहूम उस्ताद मियाँ मुनीर खॉं साहेब


अ} जन्म आणि बालपण :- उस्ताद मुनीर खॉं साहेबांचा जन्म इ.स. १८६३ साली मेरठ जिल्ह्यातील ललियाना ह्या खेड्यात झाला. तबल्याचे प्राथमिक धडे त्यांनी आपल्या वडलांकडून उस्ताद काले खॉं साहेबांकडून घेतले. उस्ताद काले खॉं हे त्यावेळचे सुप्रसिद्ध तबला नवाझ होते.


ब} प्रगत शिक्षण :- वयाच्या पंधराव्या वर्षी फरुखाबाद घराण्याचे संस्थापक उस्ताद हाजी विलायत अली खॉं यांच्या मुलाचा, उस्ताद हुसेन अली खॉं यांचा गंडा त्यांनी बांधला. त्यांच्याकडे पंधरा वर्षे तालीम घेतल्यानंतर दिल्ली घराण्याचे उस्ताद खलिफा बोली बक्श खॉं साहेब यांच्याजवळ गंडाबंध शागिर्दी पत्करली. त्यांचे पुत्र उस्ताद नथ्थू खॉं साहेब व मुनीर खॉं साहेब हे दोघे गुरुबंधू होते. त्याशिवाय नजर अली खॉं साहेब, ताज खॉं, नासर खॉं पखवाजी वगैरे एकंदर चौवीस उस्तादांचे शिष्यत्व पत्करून त्यांनी आपला तबला समृद्ध केला.


क} वादन वैशिष्ट्ये :- उत्कृष्ट तबला वादनाखेरीज त्यांची साथ-संगत अनेक गवय्ये आणि तंतुवादकांकडून वाखाणली गेलेली आहे. त्याशिवाय ते प्रतिभावान रचनाकार आणि समर्थ शिक्षक होते. त्यांनी केलेल्या रचना त्यांच्या बुद्धिमत्तेची, कलेची आणि विद्ववत्तेची साक्ष देतात. निरनिराळ्या घराण्यातील वादन वैशिष्ट्यांमधील चांगली वैशिष्ट्ये उचलून त्यांनी स्वतःचा असा प्रगल्भ तबला बनवला. त्यामुळे त्यांच्यापासून एका नव्या घराण्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यांच्या आयुष्याचा मोठा भाग त्यांनी मुंबईत घालवला त्यामुळे त्यांच्या घराण्याला 'बंबई घराणे' असे संबोधले जाते. काही वर्ष ते रायगढच्या महाराजांच्या पदरी त्यांचे उस्ताद म्हणून राहिले होते.


ड} शिष्य परिवार :- त्यांनी तयार केलेला शिष्य संप्रदाय एवढा नाणावलेला आहे की, त्यांच्या सारखा उदार मनाचा उस्ताद भारतीय संगीत क्षेत्रात झाला नाही, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांनी तयार केलेल्या प्रथितयश शिष्यांची नावे पाहिल्यावर याची खात्री पटते. उस्ताद अमीर हुसेन खॉं, उस्ताद गुलाम हुसेन खॉं, उस्ताद अहमद जान थिरकवा, उस्ताद हबिबउद्दीन खॉं, उस्ताद नझीर खॉं, उस्ताद अल्लाह मेहेर, उस्ताद सादक हुसेन खॉं, उस्ताद मुश्ताक हुसेन खॉं, उस्ताद शमशुद्दीन खॉं, उस्ताद बाबालाल इस्लामपूरकर, उस्ताद विलायत हुसेन खॉं, उस्ताद निसार हुसेन खॉं, उस्ताद हसना खॉं, डॉ. फैज जंग बहाद्दूर, अयुब मियाँ, औलाद हुसेन, अब्दुल रहीम मियाँ, विष्णुजी शिरोडकर, सुब्राव मामा अंकोलेकर इ.


इ} मृत्यू :- असे हे प्रगल्भ तबला नवाझ, १८ नोव्हेंबर १९६७ रोजी रायगढ येथे पैगंबरवासी झाले. या महान कलाकाराचे वास्तव्य अधून मधून हैद्राबाद येथे त्यांच्या बहिणीकडे असे. त्यांना मुलगा नव्हता त्यामुळे त्यांच्या मागून खलिफा पदाचा वारसा त्यांचे सांगण्यावरून उस्ताद अमीर हुसेन खॉं साहेबांकडे आला.

Recent Posts

See All

उस्ताद गामे खॉं

१} बालपण आणि शिक्षण :- दिल्ली घराण्याचे सुप्रसिद्ध तबला नवाझ मरहूम उस्ताद छोटे काले खॉं साहेबांचे हे सुपुत्र. वयाच्या पाचव्या वर्षांपासून...

उस्ताद इनाम अली खॉं साहेब

१} जन्म :- उस्ताद ईनाम अली खॉं साहेबांचा जन्म १२ नोव्हेंबर १९२८ रोजी झाला. दिल्ली घराण्याचे मशहूर तबला नवाझ उस्ताद गामे खॉं साहेबांचे हे...

Comments


bottom of page