top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

लय आणि लयकारी - २


'लघु-काल-भाव' थोडक्यात -


मात्रेचा सर्वात लहान भाग म्हणजे लघु. मात्रा म्हणजे ताल मोजण्याचे परिमाण होय. पण तालातील प्रत्येक मात्रा ही अवकाशमय असते. लयीचा जो मोठा कालखंड सातत्त्याने पुनरावृत्तीत होत असतो, त्याला 'ताल' असे म्हणतात. हा ताल पुन्हा पूर्व नियोजित समान कालखंडांमध्ये विभागला गेलेला असतो. हे समान कालखंड म्हणजेच 'मात्रा' होय. अजून पुढे गेल्यानंतर या मात्रा-कालखंडाचेही विभाजन करता येऊ शकते. म्हणजेच एका मात्रेचे २,३,४,६ इ. अनेक भाग करता येऊ शकतात व हे सूक्ष्म भाग म्हणजेच 'लघु' होय. ज्याप्रमाणे तालामध्ये असणाऱ्या प्रत्येक मात्रेमधील अंतर हे समान असते, त्याचप्रमाणे मात्रेच्या या लघुंमधील अंतरही समान असते.

लघुंमधील या समान अंतराची जाणीव म्हणजेच 'लघु-लय' अथवा 'लघु-काल-लय (भाव)' होय. या लघु लयीवर जेवढे प्रभुत्व अधिक तेवढी वादकाची अथवा गायकाची समग्र लयीवरची स्थिरता अधिक असते.


'गुरु-काल-भाव' थोडक्यात -


जरी तालातील प्रत्येक मात्रा ही लघु पासून बनलेली असली तरी तालातील विविध रचनांना, त्या रचनांमध्ये असणाऱ्या विविध शब्दबंधांमुळे आकृती वा व्यक्तिमत्व लाभत असते. हे शब्दबंध खरेतर लघुंपासूनच बनलेले असतात, परंतु त्यांची काही वैशिष्ट्ये असतात, ती खालीलप्रमाणे-


१) या शब्दबंधांमधील लघुंची संख्या नियमित असतेच असे नाही.

उदा. धातीट - ३ लघु, धाधा तीट - ४ लघु, धाती धागेना - ५ लघु,

धागे धीनागिना - ६ लघु इ.


२) या शब्दबंधांची जाणीव, त्यातील लघुंमुळे न होता त्यातील नाद-भाषेमुळे होते.

उदा. धाती धागेना, धीट ताकेना, धागे धीनाना, कत धा S न इ.


३) असे विविध नाद-भाषायुक्त शब्दबंध कलात्मक रीतीने जोडून रचना बांधल्या जातात. या रचना ऐकताना जो प्रत्यय श्रोत्यांना येतो, त्यालाच 'गुरु-काल-भाव' असे म्हणतात.

Recent Posts

See All

लय आणि लयकारी - ३

लय आणि लयीचे प्रकार - स्वर आणि लय यांचा उपयोग करून सादर केल्या जाणाऱ्या कलेस 'संगीत' असे म्हणतात. अर्थात संगीतात लयीला अनन्यसाधारण महत्व...

लय आणि लयकारी - १

प्रस्तावना- संगीतामध्ये लय व लयकारी या दोन बाबी अतिशय महत्वाच्या आहेत. लय म्हणजे संगीताच्या पंचप्राणांपैकी एक होय. केवळ संगीतातच नव्हे तर...

コメント


bottom of page