top of page

फरुखाबाद घराणे

  • Writer: Team TabBhiBola
    Team TabBhiBola
  • Dec 13, 2020
  • 2 min read

Updated: Jan 29, 2021


४) फरुखाबाद घराणे :- खुल्या बाजातील लखनौ या आद्य घराण्याचे हे

शागीर्द घराणे होय. लखनौ घराण्याचे उस्ताद बक्षू खॉं यांचे जावई उस्ताद हाजी विलायत अली खॉं यांना या घराण्याचे आद्य प्रवर्तक मानले जाते. लखनौ-पूरब वादनशैली व फरुखाबाद वादनशैलीत फारसा फरक नाही, पण तरीही फरुखाबाद घराणे हे आपल्या अनोख्या वादन वैशिष्ट्यांमुळे लखनौ पेक्षा निराळे व स्वतंत्र बनले.


फरुखाबाद वादन वैशिष्ट्ये :- लखनौचे शागीर्द घराणे असल्यामुळे या

घराण्यावर पखवाजाचा, विशेषतः गत-तोडे, चक्रदार अशा खुल्या रचनांचा प्रभाव होता. पण या बाजातील विचारवंतांनी आपल्या बाजामध्ये पेशकार, कायदे, रेले यांचा समावेश केला. त्यामुळे हे घराणे सर्वसमावेशक रचना व निकास या वैशिष्ट्यांबाबत सुवर्णमध्य गाठणारे ठरले. तबला-डग्ग्यावरील सर्व प्रकारचे निकास तसेच वादनातील जवळजवळ सर्वच वादनप्रकारांचा समावेश केल्याने हे घराणे अतिशय समृद्ध बनले. या घराण्याने आपली शैली निर्माण करताना ती आवश्यक तेवढी नाजूक, मुलायम तरीही आवश्यक तेवढी जोरदारही होईल याकडे लक्ष दिले. पूर्वी पेशकार हा दिल्ली बाजात वाजविला जात असे, पण त्यानंतर फरुखाबाद घराण्याने निर्माण केलेला पेशकार अतिशय लोकप्रिय ठरला.

फरुखाबादमध्ये कायदेही वाजविले जातात. त्यामध्ये बहुतेक सर्व निकासाच्या अंगांचा समावेश झालेला दिसतो. लव, चाट, शाई तसेच डग्ग्यावरील मिंडकाम, घिसकाम, घुमारा इ. सर्व अंगांचा समावेश असलेले कायदे फरुखाबाद घराण्यामध्ये आढळतात. दिल्लीच्या मानाने या घराण्याचे कायदे मोठे असतात, की ज्यांना 'लंबछड' कायदे असेही म्हणतात.


फरुखाबादमध्ये 'धिनतक, तिट-घिडनग' इ. बोलांचा वापर रेल्याच्या अनेक रचनांमध्ये करण्यात आलेला आहे. फरुखाबादच्या गत-तुकड्यांमध्ये 'धगत्तकीट, केत्रके धिकीट, धागेना धात्रके, कत् तिट तिट' इ. बोलांचा वापर जास्त करण्यात आलेला आहे. तसेच 'धिरधिरकिटतक तकीट धा' ही बोलपंक्ती या घराण्यातील प्रमुख बोलपंक्ती आहे असे म्हणता येईल. या वादनशैलीत 'घडान, गद्दी घडान, घिडनग, केत्रके धिकीट, धिरधिरकिटतक, धागे तिट - ताके तिट, तकीट धा' इ. समूहांचा समावेश जास्त आढळतो. फरुखाबाद घराण्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या घराण्यातील बहुतेक वादक हे उकृष्ट कलाकार तर होतेच पण त्याचबरोबर तेवढ्याच उच्चप्रतीचे रचनाकारही होते. त्यामुळे हे घराणे पिढ्यान पिढ्या आपल्या नवनवीन रचनांनी समृद्ध होत गेले.


सुप्रसिद्ध तबलावादक :- उ. मुनीर खॉं, उ. थिरखवाँ खॉं, उ. अमीर हुसेन खॉं, उ. करामतुल्लाह खॉं, पं. अरविंद मुळगांवकर, पं. भाई गायतोंडे इ.

Recent Posts

See All
पंजाब घराणे

६) पंजाब घराणे - भारतातील सहा प्रमुख घराण्यांपैकी 'पंजाब' घराणे हे तबलावादनातील वैशिष्टयपूर्ण घराणे ठरले ते त्याच्या तबला वादनातील...

 
 
 
बनारस घराणे

५) बनारस घराणे :- या घराण्याचे संस्थापक पंडित रामसहाय हे होत. हे लखनौ घराण्याचे खलिफा उस्ताद मोदू खॉं यांचे शिष्य. पं.रामसहाय यांनी...

 
 
 
लखनौ घराणे

३} लखनौ घराणे :- दिल्ली घराण्याच्या उदयानंतर थोड्या अवधीतच लखनौ घराण्याचा जन्म झाला. या घराण्यावर पखवाजाचा अत्यंत प्रभाव असल्याने या...

 
 
 

Commenti


bottom of page