top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

दक्षिण हिंदुस्थानी ताल-पद्धतीची वैशिष्टये


१) यात प्रमुख सात ताल आहेत.


२) प्रत्येक तालाच्या पाच जाती आहेत ज्या लघू या मात्रेच्या मूल्यांकानुसार होतात. असे एकूण ३५ ताल होतात.


३) त्या ३५ तालांच्या प्रत्येकी पाच जाती होतात व असे एकूण १७५ ताल होतात.


४) दक्षिण ताल-पद्धतीत लघू या मात्रेस अतिशय महत्व आहे. ही लघू मात्रा प्रत्येक तालाच्या सुरवातीस असते.


५) लघूचे मुल्यांक पंचजातीप्रमाणे बदलते व त्यामुळेच मुळच्या ७ तालांचे ३५ ताल होतात. हे मुल्यांक पंचजातीत अनुक्रमे ४,३,५,७,९ असे असतात.


६) दक्षिण ताल पद्धतीत खाली मात्रा नसते.


७) ताल-पद्धतीत जितकी ताल चिन्हे तितक्या टाळ्या देतात.


८) लघुमात्रेचे मुल्य जेव्हा जातीप्रमाणे असते तेव्हा ते टाळी व इतर बोटे यांच्या सहाय्याने दर्शविले जाते.


उदा. चतुस्त्र जाती - लघु ४ मात्रा, १ ठोका, ३ बोटे.

तिस्त्र जाती - लघु ३ मात्रा, १ ठोका, २ बोटे.

खंड जाती - लघु ५ मात्रा १, ठोका, ४ बोटे.

मिश्र जाती - लघु ७ मात्रा, १ ठोका, ६ बोटे.

संकीर्ण जाती - लघु ९ मात्रा, १ ठोका, ८ बोटे.


९) या तालपद्धतीत प्रत्येक ताल समेपासूनच सुरू होतो.


१०) तालामध्ये निश्चित बोल नसतात. वादक आपल्या कल्पनेनुसार तालामध्ये बोल वाजवित असतो.


११) दक्षिण हिंदुस्थानी संगीतात तबला अथवा पखवाज ही ताल वाद्ये न वापरता मृदंगम, घटम इ. तालवाद्ये वापरली जातात.

Recent Posts

See All

Comments


bottom of page