top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

अजराडा घराणे

२) अजराडा घराणे :- उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील अजराडा या गावावरून या बाजाला अजराडा हे नाव मिळाले. हे घराणे दिल्लीचे शागीर्द घराणे म्हणून ओळखले जाते. दिल्लीचे शागीर्द घराणे असल्यामुळे दिल्ली व अजराडा घराण्यातील वादनपद्धतीमधे फारसा फरक दिसत नाही. दिल्ली घराण्याचे प्रसिद्ध तबलावादक कल्लू खॉं व मिरू खॉं हे उत्तर प्रदेशातील अजराडा या गावी स्थायिक झाले. दिल्ली घराण्याच्या या शिष्यांनी अजराडा या ठिकाणी तबला वादनाची एक वेगळीच शैली विकसित केली. दिल्ली घराण्याच्या वादनपद्धतीमध्ये थोडासाच परंतु आकर्षक असा बदल करून या दोघा बंधुंनी तबला वादनाची एक वेगळी शैली विकसित केली व अजराडा या त्यांच्या गावाच्या नावावरूनच या घराण्याला अजराडा हे नाव मिळाले. अजराडा घराण्याने बाज व विचारप्रणाली बाबतीत आपले वेगळेपण जपले आणि तबला वादनामधे आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले.


अजराडा वादन वैशिष्ट्ये :- या घराण्याने दिल्ली प्रमाणेच बंद बाजाचा

स्विकार करुन पूर्वांग प्रधान रचनांना महत्व दिले. या घराण्यातील वादकांनी व रचनाकारांनी तबल्याइतकेच डग्ग्याला व त्यावरील मिंड कामाला महत्व दिले. या व्यतिरिक्त आणखी एक महत्वाचा टप्पा म्हणजे बायाँवरती योग्य ठिकाणी व योग्यवेळी केले जाणारे घिसकाम. या घराण्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आड लयीच्या कायद्यांचा विचार या घराण्यात जास्त झाला. म्हणजे 'तिस्त्र' जातीच्या कायद्यांची निर्मिती व वादन जास्त प्रमाणात होऊ लागले. धिन धिनागीन, धात्रक धेतीट, धातग - घेतग या तीस्त्रजाती वाचक बोलांचीनिर्मिती व वापर तबला वादनात सुरु झाला. नंतर, दिल्ली घराण्यात किनारीच्या अतिवापरामुळे येणारा एकसुरीपणा कमी करण्यासाठी शेवटी 'ना' ऐवजी 'न' चा वापर जास्त होऊ लागला. याशिवाय अजराडा घराण्यातील वादकांनी तबल्यातील गोडवा कसा वाढेल याकडे विशेष लक्ष दिले व तो कर्णमधूर बनवला. अजराड्याने बोलांची रचना अशी केली की, मिंडकाम व घिसकाम या दोन्ही निकासाच्या अंगांना पुरेसा वाव मिळेल. म्हणून अजराड्याच्या रचनांमधे अनेक ठिकाणी काही अक्षरांनंतर विराम, विश्रांती दिसून येते. अजराड्याने आणखी एक केलेला प्रयोग म्हणजे बऱ्याचश्या कायद्यांची 'खाली' वेगळ्या पद्धतीने सिद्ध केली. तसेच फरशबंदी तत्वाचा वापर कायद्यामध्ये केलेला दिसून येतो. या फरशबंदी तत्वाचा वापर अजराडा घराण्यातील चतुस्त्र जातीच्या कायद्यांमध्येही केलेला दिसून येतो. अजराडाने केलेले हे सगळे प्रयोग, त्यांच्या रचना अधिक गतिमानतेने वाजवण्यासाठी उपयुक्त बनले व गतिमानता हे देखील अजराड्याचे एक वैशिष्ट्य बनले.


अजराडा घराण्यातील वादक / शिष्य परिवार - उ. शम्मू खॉं, उ. हबिबुद्दीन खॉं, उ. नियाजू खॉं, उ. अक्रम खॉं, पं. यशवंत केरकर, पं. श्रीधर पाध्ये इ.

Recent Posts

See All

पंजाब घराणे

६) पंजाब घराणे - भारतातील सहा प्रमुख घराण्यांपैकी 'पंजाब' घराणे हे तबलावादनातील वैशिष्टयपूर्ण घराणे ठरले ते त्याच्या तबला वादनातील...

बनारस घराणे

५) बनारस घराणे :- या घराण्याचे संस्थापक पंडित रामसहाय हे होत. हे लखनौ घराण्याचे खलिफा उस्ताद मोदू खॉं यांचे शिष्य. पं.रामसहाय यांनी...

फरुखाबाद घराणे

४) फरुखाबाद घराणे :- खुल्या बाजातील लखनौ या आद्य घराण्याचे हे शागीर्द घराणे होय. लखनौ घराण्याचे उस्ताद बक्षू खॉं यांचे जावई उस्ताद हाजी...

Comentários


bottom of page