top of page

तबला या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. तबल्यामध्ये प्रात्यक्षिक (प्रॅक्टिकल) एवढेच महत्व तबल्याच्या सिद्धांताला (थिअरी) आहे, आणि या दोन्ही बाबी एकमेकांना पूरक आहेत. तबल्याच्या सिद्धांताचा (थिअरीचा) परिणाम हा 'रियाज' करताना, तबला वादन करताना होत असतो. त्यामुळेच, ज्यांना तबला वादनाची आवड आहे, शिकण्याची इच्छा आहे, खास करून जे छोट्या शहरात-गावात राहतात आणि ज्यांना तबल्याची सविस्तर माहिती (थिअरी-सिद्धांत) उपलब्ध होत नाही, त्यांच्यासाठी ही वेबसाईट उपयुक्त आहे. 

           

तबला-निर्मितीचा इतिहास, त्यातील 'घराणी', त्या त्या घराण्यांची वैशिष्टये, तबला वादनातील महान तबला वादकांचे योगदान, अशा अनेक विषयांची थोडक्यात आणि सोप्या भाषेत माहिती या वेबसाईटवर उपलब्ध आहे. यामुळे तबला वादनाबरोबरच त्याच्या सिद्धांताचे (थिअरीचे) महत्व ओळखून त्याचाही अभ्यास व्हावा व त्यामध्ये गोडी निर्माण व्हावी, हा ह्या वेबसाईट मागचा मुख्य उद्देश आहे. अर्थात तबला-अभ्यासकांना देखील ही वेबसाईट उपयुक्त व्हावी. 

            

हे सर्व एकाच वेबसाईटवर उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या, इच्छुकांच्या, तबला-वादकांच्या आणि अभ्यासकांच्या, त्रासाची व वेळेची बचत व्हावी हीसुद्धा ह्या वेबसाईट मागची प्रेरणा आहे. 

            

या वेबसाईटला 'तब भी बोला' हे नाव देण्याचे कारण म्हणजे, 'तबला' ह्या नावाच्या व वाद्याच्या निर्मितीमागची एक मनोरंजक आख्यायिका होय. पखवाजाचे दोन तुकडे केल्यानंतरही त्या दोन भागातून निघालेले बोल ऐकून, 'तब भी बोला' असे उद्गार निघाले. आणि त्याचाच अपभ्रंश होऊन पुढे, 'तबला' हा शब्द आणि वाद्य निर्माण झाले असावे असे मानले जाते. यावरूनच या 'वेबसाईट'ला 'तब भी बोला' हे नाव द्यावेसे वाटले!

bottom of page